
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लाडका लेक सोहम बांदेकर देखील मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोहम बांदेकर लग्नामुळे चर्चत आला आहे. सोहम लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.नुकतेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी येऊन सोहमचा थाटात केळवण साजरा केले. या केळवणाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नुकतेच सोहम बांदेकरचं केळवण दादरच्या आस्वाद हॉटेलमध्ये खूप थाटात पार पडले. ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले आणि अभिजीत केळकर यांसारख्या नामवंत कलाकारांनी या सोहळ्याचे आयोजन केले.आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरही या सोहळ्यात उपस्थित होते. फुलांच्या पाकळ्यांनी त्यांचं स्वागत करण्यात आलं. सुंदर मुंडावळ्या घालून, सोहम याचं औक्षण करण्यात आलं.
सोहळ्याचा जेवणाचा खास मेन्यूही आकर्षक होता –खरवस, दुधी हलवा, बासुंदी, श्रीखंड आणि मोदक बाकी ३ भाज्या, कढी, मसाले भात, पुऱ्या, कोशिंबीर, ताक, कुरडई. अशी पंच पक्वान होती जेवणाला.सोहमच्या केळवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहते उत्साहात आहेत.
‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेत्री पूजा बिरारी ह्या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कारण असे बोलले जात आहे की, पूजा सोहम बांदेकरांची सून होणार आहेत. माहिती अशी की, पूजा यंदाच्या वर्षी बांदेकरांच्या घरच्या गणपती बाप्पाच्या महाआरतीला उपस्थिती दर्शवली होती. तसेच दिवाळीत सोहमने पूजाने शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर खास हार्ट इमोजी देऊन कमेंट देखील केली होती.त्यावर अनेकांनी कमेंट्स करत लग्नाबद्दल विचारणा केली होती. , ‘ गणपती बरोबर तुमच्या भावी सुनबाई चे पण दर्शन झालं . सासू सून सोबत एकदम मस्त दिसतायत दृष्ट काढा ‘असंही एका चाहत्याने लिहीलं. पुजा बिरारी आणि सोहम ची news खरी आहे म्हणजे! अशी कमेंटही एकाने केली होती. तर, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे ही बातमी चाहत्यांसाठी अजून उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.