
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“मिसेस देशपांडे” ही नुकतीच नवीकोरी वेब सीरिज १९ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्रीबरोबर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियंशु चॅटर्जी हे महत्त्वाच्या भुमिकेत असणार आहेत. तसेच या वेब सीरिजचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले असून, ही एक सस्पेन्स आणि थ्रिलर कथा असणार आहे. या आगामी येणाऱ्या वेब सीरिजच्या निमित्ताने नवराष्ट्रच्या “मिसेस देशपांडे” मधील कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. ही कथा, नव्या जॉनरची कलाकृती? माधुरी दीक्षित यांची निवड? आणि सिद्धार्थ, प्रियंशुचे कास्टिंग? या सगळ्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत.
लग्न आणि ‘तारिणी’ने २०२५ बनवले शिवानीसाठी खास! म्हणते “आरोग्यसंकल्पांसह २०२६ चे स्वागत…”
दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांना सिद्धार्थच्या कास्टिंगबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “जेव्हा मी या वेब सीरिजचे लेखन करत होतो, तेव्हाच माझ्या मनात विचार आला की जर सीरिजची कथा ही मुंबई महाराष्ट्रमध्ये घडणारी आहे. तर, कलाकार देखील मराठी हवे. आणि त्यामुळे मराठी कलाकारांची निवड केली. माझी आधीची सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ तेव्हा पासून मला जास्त अनुभव मिळाला आहे. तसेच माधुरी यांनी मला या सीरिजसाठी होकार दिला, तेव्हा पासूनच माझ्या मनात स्टारकास्ट तयार होती. आणि सिद्धार्थची निवड मी आधीच केली होती, कारण मला माहित होत की मला जो संदेश त्याच्या पात्रातून पोहचवायचा आहे तो ते बरोबर पोहचवले आणि सिरीजमध्ये आशिषचे पात्र सिद्धार्थ करत आहे जो माधुरी दीक्षित यांच्या सोबत पोलीस अधिकारी म्हणून काम करतो.”
दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांच्या तोंडून कौतुकाचे बोल ऐकल्यानंतर सिद्धार्थ यावर म्हणाला, “एका कलाकारासाठी दिग्दर्शकाचा विश्वास आपल्यावर असणं हे जास्त महत्वाचं आहे. मी जेव्हा सरांसोबत ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ करत होतो तेव्हा मला स्वतःला देखील वाटलं नव्हतं की मी ही भूमिका एवढी चांगली करेल आणि प्रेक्षकांना ती आवडेल. पण सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यात यशस्वी झालो. तसेच आता “मिसेस देशपांडे” या वेब सीरिजची तयारी करताना देखील मला काही गोष्टी समजल्या नाही तरी सरांसोबत बोलून ते पटकन सुटायच्या, आणि मला तेव्हा लगेच समजायचे की मला असे नाही तर असा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा आहे.”
पुढे प्रियंशु चॅटर्जी अभिनेते यांना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘माझी जेव्हा नागेश यांनी या वेब सीरिजसाठी निवड केली तेव्हा मला खूप आनंद झाले, आणि नंतर त्यांना भेटल्यानंतर “मिसेस देशपांडे” सीरिजची कथा, माझे पात्र या सगळ्याबद्दल जाणून घेतल्यानंतर मला स्वतःचा अभिमान वाटला, की या सीरिजसाठी नागेश यांनी माझी निवड केली आणि मी या कथेचा एक भाग आहे. प्रियंशु पुढे म्हणाले, ‘मी या वेब सीरिजमध्ये पोलीस अधिकारी अरुण खत्रीचं पात्र साकारलं आहे. या आधी देखील मी पोलिसांचे पात्र साकारलेले आहे, परंतु हे पात्र माझ्यासाठी खास आहे. आणि नागेश यांनी या पात्राला खूप काही दिलं आहे आणि ते जास्त खुललं आहे.
तसेच “मिसेस देशपांडे” ही थ्रिलर वेब सीरिज आज १९ डिसेंबरला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे, ज्याची कथा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. बॉलीवूड मधील धकधक गर्ल माधुरी दीक्षित या सीरिजमध्ये वेगळीच भूमिका साकारणार आहे, वेब सीरिजचे टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता तर वाढवलीच, परंतु आता ती पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. माधुरी आणि सिद्धार्थने या आधीही एकत्र काम केलं आहे. तसेच त्यांना पुन्हा एकदा एकत्र काम पाहणे ते दोघांच्या चाहत्यांना आनंदाची पोचपावती मिळाली आहे.