Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चौथ्या आठवड्यातही दमदार ‘दशावतार’! महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो

'दशावतार' चित्रपटाचा हा चौथ्या आठवडा सुरु आहे. अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूल घालत आहे. तसेच या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 05, 2025 | 11:24 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • चौथ्या आठवड्यातही दमदार ‘दशावतार’
  • महाराष्ट्रात दिडशे चित्रपटगृहात दोनशेहून अधिक शो
  • चौथ्या आठवड्यात ‘दशावतार’ ची दमदार कमाई

हिंदी चित्रपटांच्या चर्चेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाने आपला पाया चित्रपटगृहात भक्कम ठेवला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ चित्रपटाने बाॅलीवूडच्या इतर चित्रपटाला धडक दिली असली तरी ‘दशावतार’ ने चौथ्या आठवड्यातही आपले स्थान बळकट केले आहे. चौथ्या आठवड्यातसुद्धा ‘दशावतार’ दिडशे थिएटर्स आणि सुमारे दोनशेच्या वर शो करून प्रेक्षकांची तुफान गर्दी दिसली आहे. हीच मराठीतील सकस कथेची, अर्थपूर्ण मराठी चित्रपटाची आणि सुजाण मायबाप रसिकांच्या प्रेमाची ताकद आहे. या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटाने गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला. अमेरिकेत शंभरहून जास्त शो होत आहेत तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देश येथे ‘दशावतार’ ने आपला झेंडा फडकवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच काळानंतर हे सळसळते चैतन्य लोकांना अनुभवायला मिळाले आहे. दशावतार मुळे चित्रपट गृहांनी गणेशोत्सवानंतर लागलीच आपली दिवाळी साजरी केली.

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

कोकणातील अनेक बंद चित्रपटगृहांची दारे ‘दशावतार’ चित्रपटासाठी पुन्हा उघडली. तर पूर्ण वर्षभराचे उत्पन्न कोकणातील चित्रपटगृहांनी एकट्या ‘दशावतार’ वर कमावले. काही खेड्यांमध्ये कंटेनर थिएटर ‘दशावतार’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात पोहोचले. या चित्रपटाने लोकांचा उदंड प्रतिसाद तर मिळवलाच पण मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळात ‘दशावतार’ ची खूप प्रशंसा झाली. अशा रितीने मराठी चित्रपट उद्योगाला आलेली अडचण दूर करून मराठी चित्रपटाला नवचैतन्य देण्याचे काम दशावतार चित्रपटाने केले आहे . इतकेच नव्हे तर ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा एक तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरला आहे. कोकण आणि गोवा इथंवरच मर्यादित असलेल्या दशावतारी नाटकांना पुण्या मुंबईतून खेळांची मागणी येत आहे.

‘जर कोणी ड्रग्जसह पकडले गेले तर…’, वादादरम्यान समीर वानखेडे यांचे स्पष्टीकरण; आर्यन खानबद्दल म्हणाले…

‘दशावतार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे फक्त प्रेम कमावले नाही तर ते आत्मसात करण्याचा अनुभवही मिळवला. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे. कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी तो सजग झाला आहे. नुकताच ( २७ सप्टेंबर २०२५) जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीने निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्याशी कातळशिल्पं जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी सामंजस्य करार केला आहे. यामुळे कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचा विकास होणार आहे. मराठी सिनेउद्योग , दशावतारी कला, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाबाबत होत असलेले सकारात्मक बदल हेच ‘दशावतार‘ या चित्रपटाचे फार मोठे यश म्हणावे लागेल.

Web Title: Superhit dashavatar box office collection theaters remain housefull in fourth week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • Box Office
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र
1

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

‘जर कोणी ड्रग्जसह पकडले गेले तर…’, वादादरम्यान समीर वानखेडे यांचे स्पष्टीकरण; आर्यन खानबद्दल म्हणाले…
2

‘जर कोणी ड्रग्जसह पकडले गेले तर…’, वादादरम्यान समीर वानखेडे यांचे स्पष्टीकरण; आर्यन खानबद्दल म्हणाले…

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…
3

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
4

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.