(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आज गणेश चतुर्थीनिमित्ताने सर्वत्र गणपती बाप्पांचं आगमन झाले आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक कलाकारांनी घरी बाप्पाचं स्वागत केले आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी देखील बाप्पाचं मोठ्या थाटात आगमन झालं आहे. स्वप्निल जोशीच्या घरचा बाप्पा हा दरवर्षी स्पेशल असतो. स्वप्निल जोशीच्या घरी बाप्पांची धातूची मूर्ती बसवली जाते. यावर्षी देखील स्वप्निलने आनंदाने बाप्पाचे स्वागत केले. तसेच स्वप्निलने घरी येणाऱ्या पाहुण्यांना खास आवाहन देखील दिले होते. की मिठाई नको तर येताना अर्धा किला तांदूळ आणा असे त्याने म्हटले होते.
स्वप्निल जोशी म्हणाला, ‘दरवर्षी माझ्या घरच्या गणपतीच्या दर्शनावेळी अनेक जण मिठाई आणायचे. मिठाई सर्वांना वाटूनही उरायची. उरलेल्या मिठाईचं करायचं काय, हा प्रश्न आम्हाला पडायचा. माझ्या वडिलांनी 7 वर्षांआधी मिठाई ऐवजी गृहोपयोगी वस्तू प्रसाद म्हणून स्वीकारण्याची कल्पना मांडली. मिळालेल्या वस्तू एखाद्या गरजू संस्थेला दान करू असं ठरवलं. तेव्हापासून दरवर्षी अशा गरजेच्या वस्तू आम्ही प्रसाद म्हणून स्वीकारतो.’ असं स्वप्नील म्हणाला.
स्वप्निल पुढे म्हणाला, “आम्ही राबवत असलेला उपक्रम सगळ्यांना आवडला. आम्ही पेन्सिल बॉक्स, दोनशे पानी वही, डाळ, साखर अशा गृहोपयोगी वस्तू एकेका वर्षी मागवल्या आहेत. या वस्तू आम्ही कधी शाळा, कधी अनाथाश्रम, कधी एखाद्या समाजसेवी संस्थेला दान करत होती.” असे स्वप्नील सांगितले.
बाप्पाला घेऊन येणाऱ्या प्रसादाबद्दल स्वप्नील म्हणाला, “माझ्या मुलांना असा प्रसाद आपण का मागवतो, याबद्दल प्रश्न पडायचे. त्यामुळे आपण असा प्रसाद का स्वीकारतो, तो प्रसाद पुढे कोणाला देतो, का देतो, त्यातून कोणाला मदत होते, या सर्व गोष्टी मुलांना छान पद्धतीनं आम्ही समजावून सांगितल्या. त्यामुळे आता त्यांच्या मनातही मदत करण्याची भावना निर्माण झाली आहे. आमची मुलं आमच्याकडे पाहून ‘देण्याचे’ संस्कार शिकत आहेत. आज आमच्या घरी सुरू झालेली ही प्रसादाची परंपरा माझ्या मुलांमध्ये नकळतपणे समाजभान पेरत आहे, याचा मला खूप आनंद आहे”. असे स्वप्नीलने सांगितले.
१३ व्या दिवशीही ‘War 2’ आणि ‘Coolie’मध्ये जबरदस्त टक्कर, कमाईच्या शर्यतीत कोण आहे पुढे?
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वप्नील बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच अभिनेत्याचा आता सोशल मीडियावर घरी बाप्पाची मुर्ती आणताना दिसत आहेत. तसेच त्याच्या घरातील वातावरण आणखी आनंदी झाले आहे. स्वप्नील आणि बाप्पा हे समीकरण नेहमीच गोड राहिले आहे. बाप्पासोबत स्वप्निलचं नातं खूप खास आहे. अनेक चित्रपटामध्ये ते दिसून आले आहे. व्हिडिओमध्ये स्वप्नील देखील बाप्पाची मुर्ती हातात घेऊन खूप आनंदी दिसत आहे.