(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रजनीकांतचा ‘कुली’ आणि हृतिक रोशनचा ‘वॉर २’ बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर देत आहेत. कमाईच्या बाबतीत दोघांचेही वर्चस्व आहे. आठवड्याच्या शेवटीच्या तुलनेत दोघांच्या कमाईत घट झाली असली तरी, या दोन्ही चित्रपटांचा या वर्षातील टॉप ५ चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हृतिक रोशन आणि रजनीकांतच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे जाणून घेऊयात.
‘या’ मराठी अभिनेत्याने केली अर्थव सुदामेची पाठराखण! म्हणाला,”हिंदू धर्म…”
‘वॉर २’ चे ऐकून कलेक्शन
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘वॉर २’ ने भारतात १३ व्या दिवशी २.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याची हिंदी ऑक्युपन्सी १४.७६% होती. चित्रपटाच्या शोबद्दल बोलायचे झाले तर, सकाळचे शो ७.७३%, दुपारचे शो १३.०९%, संध्याकाळचे शो १३.९३% आणि रात्रीचे शो २४.२७% होते. चित्रपटाने आतापर्यंत भारतात २२७.२५ कोटींची कमाई केली आहे.
‘कुली’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
दुसरीकडे, रजनीकांतच्या ‘कुली’ ने १३ व्या दिवशी ‘वॉर २’ पेक्षा जास्त कमाई केली. रजनीकांतच्या ॲक्शन चित्रपटाने ३.२५ कोटींची कमाई केली. त्याची तमिळ ऑक्युपन्सी १५.१४% होती. सकाळचे शो १२.३९%, दुपारचे शो १३.७०%, संध्याकाळचे शो १५.११% आणि रात्रीचे शो १९.३६% होते. चित्रपटाच्या एकूण कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘कुली’ ने भारतात २६३.८५ कोटींचा व्यवसाय केला आहे.
वर्ल्डवाइड कलेक्शन
‘कुली’ने वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ४८३.५ कोटींची कमाई केली आहे. तर ‘वॉर २’ अजूनही रजनीकांतच्या चित्रपटापेक्षा मागे आहे. या चित्रपटाने ३४३.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. जो अजूनही ‘कुली’पेक्षा १३९.७५ कोटींनी मागे आहे. कुलीच्या मागे असूनही, हृतिक रोशनचा हा चित्रपट या वर्षातील चौथा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. दुसरीकडे, ‘कुली’ ‘सैयारा’ आणि ‘छावा’चा रेकॉर्डही मोडू शकलेला नाही आणि तो तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.