Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

”४० – ४४ डिग्री तापमानात…” तेजश्रीने सांगितला ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील ‘त्या’ बहुचर्चित सिक्वेन्सचा अनुभव!

‘वीण दोघांतली ही तुटेना’या मालिकेतील महाविवाह सोहळ्याचे शूटिंग गोव्यात पार पडत आहे. या वेळीचा अनुभव तेजश्री प्रधानने शेअर केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 06, 2025 | 05:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आज मराठी टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांना सिनेमॅटिक अनुभव देण्यात आघाडीवर आहे. छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्याचा भव्य अनुभव देणाऱ्या चॅनेल्सपैकी झी मराठी नेहमीच पुढे राहिली आहे. आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ने या दर्जाला आणखी उंची दिली आहे कारण या मालिकेत गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर दोन जोडप्यांच्या भव्य डेस्टिनेशन बीच वेडिंगचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. मराठी टेलिव्हिजनवरील हा पहिलाच प्रयत्न असून, या नव्या उपक्रमाने मालिकेला एक वेगळं स्थान दिलं आहे.

या मालिकेतील ‘स्वानंदी’ म्हणजेच तेजश्री प्रधान हिने तिचा अनुभव सांगितला. तेजश्री म्हणाली,‘वीण दोघातली ही तुटेना’ “महाविवाह सोहळा” गोव्यात झालेल्या डेस्टिनेशन बीच वेडिंगचं शूटिंग करताना मी सगळ्यात जास्त एन्जॉय केले ते म्हणजे तिथले मासे खाऊन ! तिथल्या शूटिंगची सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट सांगायची झाली तर ४० – ४४ डिग्री तापमानात समुद्रकिनारी शूट करणं. इतक्या उष्ण वातावरणात वेडिंग लूक सांभाळणं, कपडे, दागिने, मेकअप यांची काळजी घेणं आणि त्या सगळ्यात भावनांवर नियंत्रण ठेवणं हे खरंच कठीण होतं. पण तरीही आम्ही सगळ्यांनी हा अनुभव मनापासून एन्जॉय केला. लोकेशन इतकं सुंदर होतं की सूर्य मावळताना हवामान थंड, वाऱ्याचं आल्हाददायक झुळूक देणारं आणि आकाशात दिसणारा सुंदर तांबडा रंग पाहताना आमचा सगळा थकवा गायब व्हायचा. मग आम्ही सगळे सूर्यास्ताचा मस्त आनंद घ्यायचो.”

Rashmika-Vijay Wedding: विजय रश्मिका लवकरच होणार एकमेकांचे जोडीदार, ‘या’ ठिकाणी करणार थाटात लग्न

तेजश्री पुढे म्हणाली ,“ आमच्या लुक बद्दल बोलायचे झालेतर हळदी आणि वेडिंग लूक दोन्ही खूप खास होते. दोन्ही तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली. राजवाडे कुटुंब हे समाजातील एक प्रतिष्ठित घराणं म्हणून दाखवलं जातंय, त्यामुळे त्यांच्या स्टेटसला साजेसं सगळं बारकाईनं डिझाईन केलं गेलं. स्पेशल ब्लाउज डिझाईन करणं, सुंदर साड्या तयार करणं. प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं. फक्त वधू नव्हे, तर वराचाही लूक तितकाच शाही ठेवण्यात आला. ‘आधिरा’ आणि ‘स्वानंदी’ या दोघींचा वेगळा स्वभाव लक्षात घेऊन त्यांचे लूक डिझाईन करण्यात आले. मराठी टेलिव्हिजनवरील हा पहिलाच डेस्टिनेशन वेडिंग आहे असे म्हंटल जात आहे आणि पहिल्यांदा असलेली गोष्ट नेहमी खास असते. या सर्वाचं श्रेय निर्मात्याला जातं.

‘घमंड तर रावणाचाही तुटला…’, फरहानाच्या टोमण्यांनी वाढला प्रणितचा आजार? शेअर केलेली पोस्ट का केली डिलीट?

आम्ही कलाकार म्हणून फक्त ठरवलेला मार्ग अनुसरतो, पण आमचं सर्वकाही व्यवस्थित पार पडावं म्हणून प्रोड्युसरनी प्रत्येक गोष्टीची उत्तम काळजी घेतली. फ्लाइट, लोकेशन, राहण्याची सोय, हॉटेलच आतिथ्य सगळं काही अप्रतिम होतं. टीव्ही सीरियल असल्यामुळे कुठेही तडजोड झाली नाही, हे कौतुकास्पद आहे. निर्माते कधीही लाईमलाईट मध्ये नसतात, पण त्यांच्या परिश्रमामुळेच हा टप्पा गाठता आला. आम्हा सर्वांना अभिमान आहे की ‘वीण दोघातली ही तुटेना’चा हा डेस्टिनेशन बीच महाविवाह एक माईलस्टोन ठरला. आम्ही पहिले आहोत, हे सांगणं हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. असेच सुवर्णक्षणं मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा पुन्हा यावे हीच इच्छा.”

Web Title: Tejashree shares her experience of the grand wedding ceremony in the series veen doghatli hi tutena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Serial Promo: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट: समर-स्वानंदीच्या हनीमूनवर सावट, अपघातातून वाचेल का लोकप्रिय जोडी?
1

Serial Promo: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत ट्विस्ट: समर-स्वानंदीच्या हनीमूनवर सावट, अपघातातून वाचेल का लोकप्रिय जोडी?

‘उत्तर’चा भावनिक इफेक्ट! पुण्यातील अनोख्या प्रयोगामुळे आई-मुलांचं नातं पुन्हा घट्ट झालं
2

‘उत्तर’चा भावनिक इफेक्ट! पुण्यातील अनोख्या प्रयोगामुळे आई-मुलांचं नातं पुन्हा घट्ट झालं

Tarini Promo: केदारची खरी ओळख सगळ्यांसमोर, तारिणी आजीपासून दुरावणार? मालिकेत मोठा ट्विस्ट
3

Tarini Promo: केदारची खरी ओळख सगळ्यांसमोर, तारिणी आजीपासून दुरावणार? मालिकेत मोठा ट्विस्ट

लग्न आणि ‘तारिणी’ने २०२५ बनवले शिवानीसाठी खास! म्हणते “आरोग्यसंकल्पांसह २०२६ चे स्वागत…”
4

लग्न आणि ‘तारिणी’ने २०२५ बनवले शिवानीसाठी खास! म्हणते “आरोग्यसंकल्पांसह २०२६ चे स्वागत…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.