(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही त्यांचे नाते जाहीरपणे उघड केलेले नाही. काही दिवसांपूर्वी, त्यांनी गुप्तपणे साखरपुड्या केला होता. आता त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लग्नाची तारीख आणि ठिकाण निश्चित झाले आहे
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा हे या वर्षी नाही तर नवीन वर्ष २०२६ मध्ये लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी हे जोडपे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. दोघे राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न करणार आहेत. असे म्हटले जात आहे की हा भव्य विवाह उदयपूर पॅलेसमध्ये होईल, ज्यामध्ये दक्षिण आणि बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी उपस्थित राहतील.दोघांपैकी कोणीही त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल किंवा ठिकाणाबद्दल कोणतेही अधिकृत माहिती दिली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी विजयच्या हैदराबाद बंगल्यातील एका खाजगी समारंभात दोघांनी साखरपुडा केला. या प्रसंगी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
120 Bahadur Trailer: “इथेच लढायचे, आणि इथेच मारायचे…”, फरहान अख्तरच्या ऐतिहासिक शौर्यकथेची झलक
अलिकडेच, तिच्या ‘थमा’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये, रश्मिका मंदानाला तिच्या साखरपुड्याबद्दल विचारण्यात आले. हसत हसत तिने उत्तर दिले, “सर्वांना याबद्दल माहिती आहे.” दरम्यान, विजयच्या टीमने पुष्टी केली की हे जोडपे पुढील वर्षी लग्न करणार आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. रश्मिकाने सोशल मीडियावर तिच्या पिल्ला, ऑरासोबतचा व्हिडिओ शेअर केला. चाहत्यांनी तिच्या बोटात एक चमकणारी हिऱ्याची अंगठी पाहिली, जी अनेकांना विजयची साखरपुड्याची अंगठी वाटली.
KGF मधील काका हरीश राय यांचे निधन; ‘या’ गंभीर आजाराला झुंज देत घेतला अखेरचा श्वास
रशमिका आणि विजय यांची भेट २०१८ मध्ये आलेल्या गीता गोविंदम या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले. एका वर्षानंतर, ते डिअर कॉम्रेड (२०१९) मध्ये पुन्हा एकत्र आले आणि तेव्हापासून त्यांच्या पडद्याबाहेरच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरल्या आहेत.






