
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस’ मराठी सीझन चार गाजवणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा करून चाहत्यांना चकीत केले आहे. तेजस्विनी प्रसिद्ध शिवसेना नेत्याची सून होणार आहे. तसेच अभिनेत्री नक्की कोणाची सून होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.दरम्यान अभिनेत्री तेजस्विनीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेजस्विनीने दिलेल्या या आनंदाच्या बातमीने चाहते तिचे अभिनंदन करत आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीने मराठी बिग बॉसचा चौथा सीझन गाजवला होता. त्या सीझनमध्ये तिला हाताला झालेल्या दुखापतीमुळे नाईलाजास्तव एक्झिट घ्यावी लागली होती. त्यानंतर ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहच्या मालिकेत ती दिसली होती. अभिनेत्री प्रिया मराठेला तिने रिप्लेस केलं होतं. मालिकेतील खलनायिकेचं पात्र तिनं उत्तमरित्या साकारले होते. अभिनेत्रीने अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसेच ते चित्रपट हिट झाले आहेत.
तसेच, तेजस्विनी लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष होताच. अनेकदा तिला लग्नाविषयी प्रश्न देखील विचारण्यात येत होते मात्र अभिनेत्रीने कधीच तिच्या लग्नाविषयी भाष्य केले नाही आणि ते गुपित ठेवले. अखेर तिने आता साखरपुडा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आणि त्यांना खुश करून टाकले आहे. तेजस्विनी लोणारी ही शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांची सून होणार आहे. सदा सरवणकर यांचा मुलगा शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी अभिनेत्रीचा साखरपुडा झाला आहे. समाधान सरवणकर हे सुद्ध राजकारणात सक्रीय आहेत. तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी नुकताच साखरपुडा केला असून, चाहते दोघांनाही शुभेच्छा देत आहेत.
साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये तेजस्विनीने लाल रंगाचा सुंदर नक्षीकाम असलेला लेहंगा घातला आहे. हातात हिरवा चुडा आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तसेच समाधानने ऑफ वाईट रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांची भेट कुठे झाली? दोघांचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज असे प्रश्न आता चाहत्यांना पडले आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही अभिनयाव्यतिरिक्त अनेक क्षेत्रात सक्रीय आहे. ती प्राण्यांसाठी NGO चालवते. ‘छापा काटा’, ‘वॉन्टेंड बायको नंबर वन’, ‘गुलदस्ता’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘कलावती’ सारख्या अनेक चित्रपटामध्ये तिने काम केले आहे.