Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’ मालिकेतून शांभवी सिंह येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्रीने सांगितला खास अनुभव

स्टार प्लसवर लवकरच मिस्टर अँड मिसेस परशुराम ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून शांभवी सिंह प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असून तिने तिचा अनुभव शेअर केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 31, 2026 | 04:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्लसच्या आगामी मालिकेतून शांभवी सिंह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव “मिस्टर अँड मिसेस परशुराम” असून, यात शांभवी शालिनी या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या प्रोजेक्टबद्दल तिने आपल्या खास भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री शांभवी सिंह म्हणते “खरंच हे सगळं खूप खास आणि उत्साहवर्धक आहे. “मिस्टर अँड मिसेस परशुराम” ही फक्त अ‍ॅक्शनची गोष्ट नाही तर भावना, नाती आणि दैनंदिन संघर्ष आधारलेली कहाणी आहे. त्यामुळे ती सर्व पिढ्यांतील लोकांशी जोडली जाणार आहे. हृदयस्पर्शी भावनांना आणि थराराला समतोल साधणाऱ्या या मालिकेचा भाग असणं सर्जनशीलदृष्ट्या खूप समाधान देणारं आहे. लोकांचं मनोरंजन करतानाच त्यांना भावनिकरीत्या जोडणाऱ्या या प्रोजेक्टचा भाग झाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे”

आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना ती सांगते “शालिनीची भूमिका कणखर आहे पण त्यात सौम्यही आहे. स्थिर आणि आशावादीदेखील आहे. तिचा प्रेम, कुटुंब आणि प्रामाणिकपणावर मनापासून विश्वास आहे. तिची ताकद आक्रमकतेतून येत नाही तर ती येते तिच्या चिकाटीमधून, करुणेमधून आणि भावनिक समजूतदारपणातून. ती अशी स्त्री आहे जी शांतपणे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते आणि तरीही ज्या गोष्टींवर तिचा विश्वास आहे त्यासाठी ठामपणे उभी राहते.”

Birthday Special: ‘देवखेळ’ ते ‘डबल सीट’ अंकुश चौधरींच्या अभिनयातील बहुआयामीपण दाखवणाऱ्या 5 must-watch भूमिका

शालिनी आणि शिवप्रसाद यांच्या नात्याबद्दल ती म्हणते “त्यांचं लग्न विश्वास, साधेपणा आणि खरी सोबत यावर आधारलेलं आहे. ते परिपूर्ण नाहीत; त्यांच्यात मतभेद, भीती आणि कमकुवतपणा आहेत पण त्यांना खास बनवतं ते म्हणजे दररोज एकमेकांना पुन्हा पुन्हा निवडणं. त्यांचं नातं खरंखुरं वाटतं, कारण ते रोजच्या आयुष्यातील नात्यांचं प्रतिबिंब आहे.जिथे समजूत, त्याग आणि सामायिक स्वप्नांमधून प्रेम वाढत जातं.”

Marathi Serial : नागराजच्या पापाचा भरला घडा ; पण प्रोमो पाहून नेटकरी संतापले म्हणाले, “दिग्दर्शक आणि लेखकाला…

या भूमिकेसाठी लागणाऱ्या बहुआयामी अभिनयाबद्दल शांभवी सांगते, “माझ्यासाठी हे खरं तर एक खूपच रंजक आव्हान आहे कारण एक अभिनेत्री म्हणून मला सगळं माहीत असतं, पण शालिनीला ते माहीत नाही. मला सतत तिच्या भावनिक वास्तवात जगावं लागत जे पाहते आणि जे अनुभवते, त्यावरच प्रतिक्रिया द्यायची. शिवप्रसादसोबतचं तिचं निरागसपणं, विश्वास आणि भावनिक सुरक्षितता तिच्या प्रवासाला अधिक स्तरित आणि सुंदर बनवते.”

Web Title: Shambhavi singh to grace viewers through the show mr and mrs parshuram actress shares her special experience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

Tejashree Pradhan: स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’ तेजश्री प्रधान सांगतिला शुटींगचा ‘तो’ किस्सा
1

Tejashree Pradhan: स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’ तेजश्री प्रधान सांगतिला शुटींगचा ‘तो’ किस्सा

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…
2

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी
3

Tharla Tar Mag : मालिकेतील नायिकांचा शेगाव दौरा, ऑन कॅमेरा एकमेकींचा जीव घेणाऱ्या, खऱ्या आयुष्यात जीवलग मैत्रिणी

Zee Marathi : ‘दीपज्योती’ मालिकेत नात्यांचा नवा खेळ! ज्योती करणार स्वराजची ‘वर चाचणी’ तर सुलु आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?
4

Zee Marathi : ‘दीपज्योती’ मालिकेत नात्यांचा नवा खेळ! ज्योती करणार स्वराजची ‘वर चाचणी’ तर सुलु आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.