Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने! अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक

अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे यांचा 'उत्तर' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच अभिनय बेर्डेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आता हे का होतंय हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 18, 2025 | 09:53 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘उत्तर’मधील ‘नन्या’ने जिंकली प्रेक्षकांची मने
  • अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र होतंय कौतुक
  • अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत
 

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ‘उत्तर’ची टीम विविध चित्रपटगृहांना भेट देत असून, तिथे मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अक्षरशः भारावून टाकणारा आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षक कलाकारांशी संवाद साधत आहेत. विशेषतः अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षक अभिनयच्या आजूबाजूला गर्दी करताना दिसत आहेत, त्याची स्तुती करत आहेत. काही आया त्याला भेटताना भावुक होऊन बोलता बोलता रडत असल्याचंही चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळाल आहे. प्रेक्षक अभिनयला आपल्याच घरातला मुलगा मानत आहेत, हीच या चित्रपटाच्या यशाची खरी पावती आहे.

सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट पसंत पडला असून, पडद्यावर आपल्याच घरातल्या व्यक्तिरेखा वावरत असल्याचा भास होतो. रेणुका शहाणे यांनी साकारलेली आई अनेकांना आपल्या स्वतःच्या आईची आठवण करून देते, तर ‘नन्या’ हे पात्र अनेकांना आपल्या आजूबाजूला, घरात किंवा शेजारी दिसत असल्यासारखं भासत आहे. रेणुका शहाणे यांच्या सहज, संयमित अभिनयासोबतच अभिनय बेर्डेने साकारलेला ‘नन्या’ही प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजतोय.

KGF 2 च्या सह- दिग्दर्शकावर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

अनेक प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या मते, अभिनय बेर्डेच्या आजवरच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच अनेक नामवंत दिग्दर्शकांनी त्याच्या कामाचं कौतुक केलं असून, त्याला ‘डिस्कव्हरी’ असं संबोधलं आहे.

अभिनयच्या होत असलेल्या कौतुकाबद्दल दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले, ”जेव्हा अभिनयला कास्ट केलं, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. परंतु आज चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहताना मला ठामपणे वाटतंय की, माझा निर्णय योग्य होता. या भूमिकेला अभिनयशिवाय कोणीही इतका प्रामाणिक न्याय देऊ शकलं नसतं. तब्बल दहा महिने आम्ही फक्त निनाद कसा असेल, कसा बोलेल, कसा पाहील, कसा वागेल यावर काम केलं. अभिनयनेही प्रचंड मेहनत घेत १२–१३ किलो वजन कमी केल. आज त्यालाही त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. थिएटर व्हिजिटदरम्यान हाऊसफुल्ल गर्दीतून ‘नन्या सुपर्ब!’ अशी दिलखुलास दाद ऐकली आणि मी अक्षरशः भरून पावलो.”

मराठी टेलिव्हिजनमधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई! डोहाळेजेवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांच्या भूमिका आहेत. या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात आहे. सिनेमाचा प्रतिसाद बघता जोर वाढत असून शोज सुद्धा वाढत असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचा चांगलाच आवडलेला दिसत आहे.

Web Title: The character nanya in the marathi film uttar has won the hearts of the audience abhinay berde performance is being praised everywhere

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : राजधानी दिल्लीत आजपासून फक्त BS-6 वाहनांना प्रवेश
1

Top Marathi News Today Live : राजधानी दिल्लीत आजपासून फक्त BS-6 वाहनांना प्रवेश

मराठी टेलिव्हिजनमधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई! डोहाळेजेवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
2

मराठी टेलिव्हिजनमधील ‘ही’ अभिनेत्री होणार आई! डोहाळेजेवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Chandrapur News: भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान! निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग
3

Chandrapur News: भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान! निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग

‘तू माझा दहावा नवरा आहेस…’, Payal Gaming चा दुबई Video Viral; कोण आहे ‘हा’ मिस्ट्री मॅन?
4

‘तू माझा दहावा नवरा आहेस…’, Payal Gaming चा दुबई Video Viral; कोण आहे ‘हा’ मिस्ट्री मॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.