(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका पुढे असल्याचे दिसते आहे. या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. ‘कमळी’ मालिकेमधील सगळे कलाकार उत्कृष्ट काम करताना दिसत आहेत. ‘कमळी’ या मुख्य नायिकेसह यामधील इतर कलाकार सुद्धा घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. या मालिकेत राधिका ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
‘कमळी’ मालिकेत राधिका ही भूमिका अभिनेत्री सई कल्याणकरने साकारली आहे. गोड, निरागस आणि कायम सासूबाईंच्या धाकाखाली वावरणारी राधिका प्रत्येकाच्या घरोघरी पोहचली आहे. खऱ्या आयुष्यात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर लवकरच आई होणार आहे. तिच्या मैत्रिणींनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुडन्यूज सर्वांना दिली आहे. तसेच अभिनेत्रीचे फोटो चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोमध्ये तिच्या प्रेग्नंसीचा ग्लो चेहऱ्यावर दिसून येत आहे. तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे फोटो देखील शेअर केले आहेत.
सईच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आहे. अभिनेत्री नम्रता प्रधानने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईच्या डोहाळेजेवणाला नम्रता प्रधान आणि तन्वी बर्वे या अभिनेत्री उपस्थित होत्या. या फोटोत सई कल्याणकरच्या हातात ‘मी आई होणार’ असा टॅग पाहायला मिळत आहे. डोहाळेजेवणासाठी सईने खास फुलांचे दागिने घातले होते. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते आहे.
KGF 2 च्या सह- दिग्दर्शकावर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
तसेच सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने तिला मॅचिंग असे फुलांचे दागिने देखील घातले आहेत. तिच्या या फोटोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. सई कल्याणकरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लग्नानंतर ४ वर्षांनी आई होणार आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ती लग्नबंधनात अडकली होती. तिच्या पतीचं नाव आहे प्रशांत चव्हाण आहे. अभिनेत्रीच्या पतीने नॅनो केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली आहे. सईने आजवर ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.






