
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नवीन वर्षात अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशातच एक मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘आफ्टर ओ.एल.सी’ अखेर आपल्या रिलीज डेटसह सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा दमदार, ॲक्शन-पॅक्ड सिनेमा ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्यातील तगडी ॲक्शन, रहस्य आणि थरारक दृश्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येक फ्रेममध्ये वेगळी ऊर्जा आणि कथा उलगडण्याची उत्सुकता निर्माण करणारा ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे.
या चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चवरे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची भक्कम टीम पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देत चित्रपट अधिक प्रभावी केला आहे. थरार, रहस्य आणि जोरदार ॲक्शन यांचा उत्तम मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी ‘आफ्टर ओ.एल.सी’चे दिग्दर्शन केले असून, ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होणार असल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल विशेष उत्सुकता आहे.
The Kerala Story 2 Teaser: भारतातील हिंदू मुलींवर साधला निशाणा; यावेळी कथा अधिक गडद अन् हादरवणारी
दमदार कथा, जबरदस्त ॲक्शन आणि रहस्यमय प्रवास घेऊन येणारा ‘आफ्टर ओ.एल.सी’ ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून थराराची ही सफर अनुभवायला मिळणार आहे.