Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्त्रीशक्ती आणि कुटुंबीय नात्यांवर आधारित नवी मालिका,‘मी संसार माझा रेखिते’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'सन मराठी' वर 'मी संसार माझा रेखिते' या नव्या मालिकेतून अभिनेत्री दीप्ती केतकर, अभिनेता हरीश दुधाडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 29, 2025 | 03:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मालिकाविश्वात लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सन मराठी’ वर ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवी मालिका १ डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर, अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर अभिनेत्री आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, पूजा महेंद्र, अभिनेता संदीप गायकवाड, वेद आंब्रे या कलाकारांमुळे मालिकेत आणखी रंगत वाढणार आहे. नुकतीच या मालिकेची प्रेस कॉन्फरन्स पार पडली. मालिकेचा विषय हा प्रत्येक गृहिणीला आपलंस करून घेणारा आहे. आजच्या काळातही बऱ्याच महिला अनुप्रिया सारखं आयुष्य जगत आहेत. प्रत्येक स्त्री तिच्या कुटुंबासाठी काही न काही ऍडजस्टमेन्ट करत असते. आज काळ पुढे गेला आहे पण माणसांची विचारसरणी जुनीच आहे असं म्हणायला हरकत नाही. मालिकेतून स्त्रीला आणखी सक्षम कसं करता येईल हा प्रयत्न असणार आहे.

अनुप्रिया ही संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी, कोणतीच अपेक्षा न ठेवता नात्यांना जपणारी आहे. अनुप्रियाचा प्रेमविवाह झाला असून  गेली १७ वर्ष तिच्या बाबांनी तिला स्वीकारलं नाही आहे. तिच्या सासरच्या मंडळींचा देखील तिला पाठिंबा मिळत नाही. पण या सगळ्यात अनुप्रिया हसतमुखाने तिच्या जवळच्या माणसांसाठी त्यांच्या आवडी- निवडी जपत असते. मालिकेत अनुप्रियाच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम तिची मुलगी पिहू करत असते. आता कुटुंबाला सांभाळत अनुप्रिया तिच्या स्वप्नांसाठी कशी उभी राहणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. एकंदरीतच प्रत्येक कुटुंबाला आपलंस करून घेणारी ही अनुप्रियाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांना मालिकेच्या पहिल्या भागाची ओढ लागली आहे. याचसह मालिकेचं शीर्षक गीत देखील प्रेक्षकांसाठी सर्वत्र प्रदर्शित केलं आहे.

लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’, सिद्धार्थ चांदेकर – मृण्मयी देशपांडेच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी होणार रिलीज

अनुप्रिया म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर या मालिकेबद्दल म्हणाली की, “एक गृहिणी तिच्या संसारासाठी अडजस्टमेंट तिच्याच जवळच्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी करत असते. ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेतून स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे इतकंच न दाखवता तिच्या समोर येणाऱ्या प्रसंगांना तिने कशाप्रकारे तोंड दिलं पाहिजे, आपला संसार आणखी कसा सुखी करता येईल हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही गोष्ट फक्त अनुप्रियाची नसून प्रत्येक घरातील स्त्रीची आहे.”

Suraj Chavan Wedding: भावाच्या हळदीत जान्हवीचा जबरदस्त डान्स, ‘झापुक झुपूक’ वर तुफान नाचली, Video पाहा

Web Title: The new series mi sansar maza rekhite will premiere for viewers from 1st december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित
1

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित

एक महिना घरात बंद राहिलेला ‘हा’ अभिनेता ठरला The 50 या शोचा पहिला स्पर्धेक, पोस्ट करत म्हणाला, “एका सिंहाला दुसऱ्या सिंहाने”
2

एक महिना घरात बंद राहिलेला ‘हा’ अभिनेता ठरला The 50 या शोचा पहिला स्पर्धेक, पोस्ट करत म्हणाला, “एका सिंहाला दुसऱ्या सिंहाने”

‘दिल्ली थंड आहे, गाडीतच लैंगिक संबंध ठेवायला खूप…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Honey Singh ने पार केली सर्व मर्यादा
3

‘दिल्ली थंड आहे, गाडीतच लैंगिक संबंध ठेवायला खूप…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Honey Singh ने पार केली सर्व मर्यादा

Bigg Boss Marathi 6 : ”मी वाईटच बरी”, बिग बॉसच्या घरात दोन मोठे राडे होणार, कोण ठरणार वरचढ?
4

Bigg Boss Marathi 6 : ”मी वाईटच बरी”, बिग बॉसच्या घरात दोन मोठे राडे होणार, कोण ठरणार वरचढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.