(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मुंबई दूरदर्शनने प्रसारित केलेली कवी अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ हे नाटक मुंबई कांचन आर्टतर्फे पुन्हा रंगमंचावर प्रेक्षकांच्या समोर येत आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे‘ या विषयाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या कवितेचे हे एकपात्री नाट्यरूपांतर असणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक मराठी रंगभूमीवरील तरुण अभिनेते सचिन वळंजू हे सादर करताना दिसणार आहेत. रविवार ४ मे रोजी देवगड – जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात या नाटकाचा शुभारंभाचा पहिला प्रयोग यशस्वीरित्या पार पडला. या पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांना हे नाटक खूप आवडले.
“…मी गे नाहीये”, प्रतीक पाटीलने समलैंगिक असण्याच्या चर्चांवर सोडलं मौन
कवी अजय कांडर यांची मुंबई लोकवाड:मय गृहतर्फे ‘युगानुयुगे तूच’ यांची ही कविता प्रसिद्ध झाल्यानंतर या कवितेच्या एका वर्षभरात तीन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. अभिनेता सचिन वळंजू यांनी हे नाटक सादर करताना या नाटकाच्या संधीच सोनं केले आहे. युगानुयुगे तूच हे नाटक अभिनेता सचिन वळंजू खूप पुढे घेऊन जाईल, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पुढच्या सगळ्या प्रयोगाला असाच प्रतिसाद मिळेल असा त्यांचा विश्वास आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून कवी अजय कांडर यांनी ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता लिहिली. त्याचे नाटक मुंबई दूरदर्शनने यापूर्वी प्रसारित्त केले होते. त्यानंतर मुंबई कांचन आर्टतर्फे ते आता पुन्हा रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा या नाटकाचा अनुभव नव्याने घेता येणार आहे. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगानंतर डॉ. चव्हाण यांनी नाटक सादर करणारे अभिनेते सचिन वळंजू यांचे चांगलेच कौतुक केले. तसेच आता पहिल्या प्रयोगा नंतर या नाटकाचा पुढचा प्रयोग कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, येथे १० मे २०२५ रात्रौ ठिक ९. वाजता सादर होणार आहे.
एका घटस्फोटाची गोष्ट, २३ मेपासून मोठ्या पडद्यावर; ‘मंगलाष्टका रिटर्न्स’चा अफलातून ट्रेलर रिलीज
‘युगानुयुगे तूच’ या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी केले असून यापूर्वीच्या या नाटकाचेही दिग्दर्शने त्यांनीच केले होते. रघुनाथ कदम हे ज्येष्ठ दिग्दर्शक असून कवी अजय कांडर लिखित आणखी एक नाटक ‘कळत्या न कळत्या वयात’ हे सध्या मराठी रंगभूमीवर सादर होत असून त्याचे दिग्दर्शनही रघुनाथ कदम यांनीच केले आहे. ‘युगानुयुगे तूच’ या नाटकाच्या निर्मितीबद्दल सचिन वळंजू म्हणाले की, ‘कवी अजय कांडर यांची युगानुयुगे तूच ही दीर्घ कविता लोकप्रिय आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समग्र मानवाच्या कल्याणासाठी कसे कार्यरत होते याचे महत्त्व ही कविता अधोरेखित करते. जात धर्म पंथ या सगळ्या पलीकडे बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारातून सगळा समाज एकत्र राहू शकतो.’ असं ते म्हणाले. तसेच सचिन वळंजू यांनी या नाटकाची निर्मिती केली असून, त्यांनी या नाट्यप्रयोगाला नाट्य रसिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.