Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चं लवकरच कोडं सुटणार; चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या मराठी चित्रपटाचे उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा लागला प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2025 | 04:40 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाची उत्सुकता वाढवणाऱ्या टीझरनंतर आता ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात एका नव्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय ‘पावटॉलॉजी’ आहे. हे नेमके काय? याचे ‘इन्स्टिट्यूट’ कसे असू शकते? ‘पावटे’ म्हणजे काय? त्यांना या इन्स्टिट्यूटमध्ये काय शिकवले जाईल? असे एक ना अनेक प्रश्न ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चा ट्रेलर पाहिल्यावर मनात येतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना ११ एप्रिलला मिळणार आहे. कारण याच दिवशी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी, ‘बंजारा’चा अफलातून टीझर रिलीज!

फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. विजय नारायण गवंडे आणि श्रीकांत देसाई या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चे दिग्दर्शन प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी केले आहे. या दिग्दर्शक द्वयींनी पुन्हा एकदा आपल्या चित्रपटाद्वारे उत्कंठावर्धक विषय सादर केला आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’च्या ट्रेलरमध्ये चित्रपटाबाबतची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. अभिनेते गिरीश कुलकर्णींनी चित्रपटात म्हटल्याप्रमाणे आता दिवस बदलले आहेत. याच बदललेल्या दिवसांचे प्रतिबिंब ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

 

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मनात मात्र ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’बाबत काही प्रश्न आहेत. यांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटगृहांत मिळणार आहे. शिक्षकाच्या भूमिकेतील गिरीश कुलकर्णी या चित्रपटात कशा प्रकारची ‘पावटॅालॅाजी’ शिकवणार आहेत हे जाणण्याची उत्सुकता ट्रेलर पाहिल्यावर निर्माण होते. हा चित्रपट सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. येत्या उन्हाळ्यात कल्ला करण्यासाठी ‘पावटे’ सज्ज झाल्याचेही ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. या ‘पावट्यांना’ सांभाळून त्यांना शिकवण्याचे वेगळेच आव्हान चित्रपटातील शिक्षकांसमोर असणार आहे. या जोडीला ‘पावट्यांची’ धम्माल-मस्ती आणि कर्णमधूर गीत-संगीताची किनार चित्रपटाला जोडण्यात आली आहे. पावटॅालॅाजीतील एक्स फॅक्टर शिकवणारे तज्ज्ञही चित्रपटात दिसणार आहेत. त्यांचा एक वेगळाच ट्रॅक चित्रपटात धम्माल करणार आहे.

२४ तासांत ‘सिकंदर’च्या हजारो तिकिटांची विक्री, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये झाली कोटींची कमाई

संतोष शिंदे यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची कथा लिहिली असून, तर प्रसान नामजोशी यांनी दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद आणि गीतलेखनसुद्धा केले आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, अपूर्वा चौधरी, प्रगल्भा कोळेकर, कृतिका देव, हरीश थोरात, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर यांसारख्या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहे. संगीतकार विजय नारायण गवंडे यांचे सुरेल संगीत या चित्रपटाची जमेची बाजू ठरणारे आहे. सागर वंजारी यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळर संकलनही केले आहे. कला दिग्दर्शन निलेश गोरक्षे यांनी केले असून, मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी आरेखन केले आहे. छायांकन गिरीश जांभळीकर यांचे, तर व्हीएफएक्स अमिन काझी यांचे आहेत. रश्मी रोडे यांनी वेशभूषा, श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली असून, प्रशांत गाडे आणि सुमित कुलकर्णी यांनी निर्मितीव्यवस्था सांभाळली आहे.

Web Title: Trailer launch of marathi film institute of pavtology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi film

संबंधित बातम्या

तान्या मित्तल रॉयल स्वॅग! हातात Gold iPhone घेऊन आली चर्चेत, भगवान रामाच्या फोटोने वेधले लक्ष
1

तान्या मित्तल रॉयल स्वॅग! हातात Gold iPhone घेऊन आली चर्चेत, भगवान रामाच्या फोटोने वेधले लक्ष

Kriti Sanon ची लंडन फॅशन वीकमध्ये दिमाखदार एन्ट्री; Burberry लूकने वेधले लोकांचे लक्ष
2

Kriti Sanon ची लंडन फॅशन वीकमध्ये दिमाखदार एन्ट्री; Burberry लूकने वेधले लोकांचे लक्ष

“संजय लीला भन्साळींना हृदयविकाराचा झटका?” अफवांवर टीमने सोडले मौन; चाहत्यांना केले आवाहन!
3

“संजय लीला भन्साळींना हृदयविकाराचा झटका?” अफवांवर टीमने सोडले मौन; चाहत्यांना केले आवाहन!

१४ वर्षांनंतर अक्षय कुमार–प्रियदर्शनची धमाकेदार एन्ट्री! ‘Bhooth Bangla’ची समोर आली पहिली झलक
4

१४ वर्षांनंतर अक्षय कुमार–प्रियदर्शनची धमाकेदार एन्ट्री! ‘Bhooth Bangla’ची समोर आली पहिली झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.