Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुंबाडची मंजुळा’चे गुढीपाडवाच्या निमित्ताने नवं पोस्टर रिलीज; काळ्या पोपटामागचं रहस्य नक्की आहे काय?

‘तुंबाडची मंजुळा’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे गुढीपाडवाच्या निमित्ताने आज नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. जे पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 19, 2026 | 02:24 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘तुंबाडची मंजुळा’चे नवं पोस्टर रिलीज
  • काळ्या पोपटामागचं रहस्य काय?
  • ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
झी स्टुडिओ निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं एक वेधक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्या पोस्टरमध्ये एका जुन्या दरवाजावर उमटलेले हातांचे ठसे आणि दाराआड दिसणारी एक गूढ आकृती यामुळे प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. तसेच आता आणखी एक नवं पोस्टर प्रेक्षकांसाठी निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे.

Dhurandhar 2 Day 1 Prediction: ओपनिंग डेलाच ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड होणार ब्रेक? पेड प्रीव्ह्यूनेच उडवली खळबळ

आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचं आणखी एक रहस्यमय पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या नव्या पोस्टरमध्ये गावातील काही लोकांचे फक्त डोळे दिसत आहेत, तर एका व्यक्तीच्या डोक्यावर काळ्या रंगाचा पोपट बसलेला दिसत आहे. या अनोख्या आणि गूढ दृश्यामुळे “हे डोळे नेमके कुणाचे?”, “हे कलाकार कोण आहेत?” आणि “या काळ्या पोपटामागचं रहस्य काय?” असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

या पोस्टरसोबत ऐकू येणाऱ्या “गावात सारी चर्चा रे, गप्पांना आलाय ऊत! भुतानं झाडाला धरलंय की झाडानं धरलं भूत” या ओळींनी चित्रपटाचा रहस्यमय आणि थरारक माहोल अधिकच गडद केला आहे. या ओळींमुळे चित्रपटातील गाव, त्यातील पात्रं आणि एकूण कथानकाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या वेगळ्या पोस्टरबद्दल बोलताना बावेश जनवलेकर यांनी सांगितलं की, “‘तुंबाडची मंजुळा’ हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. अनेक वर्षांनंतर पूर्णपणे झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. चित्रपटाची कथा आणि विषय अत्यंत रोचक असल्यामुळे त्याच्या प्रमोशनमधील प्रत्येक गोष्ट ही वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी असावी, या उद्देशाने या पोस्टर्सची कल्पना राबवली आहे.”

‘मातृभूमि’ मधील ‘चांद देख लेना’ गाणं रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदा सिंहच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष

ते पुढे म्हणाले की, “या पोस्टरमध्ये दिसणारं गाव आणि गावकरी हे सगळेच अतरंगी आहेत. आता टप्प्याटप्प्याने चित्रपटातील विविध गोष्टी उलगडत नेल्या जातील, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढेल.” या चित्रपटाची निर्मिती उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे, तर दिग्दर्शनाची जबाबदारी वैभव कोरगावकर यांनी सांभाळली आहे. रहस्य, थरार आणि वेगळ्या कथानकामुळे ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवणारा हा चित्रपट येत्या ५ जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता या गूढ कथेमागचं रहस्य उलगडण्यासाठी चाहत्यांना थोडी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Tumbadchi manjula new poster gudipadwa zee studios marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
3

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
4

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.