Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamachya Govyala Jauya: विजू माने घेऊन येतायत मैत्री-मस्तीची धमाल गोवा ट्रिप; ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न

दिग्दर्शक विजू माने आता ‘स्ट्रगलर साला’ चित्रपटानंतर त्यांचा नवाकोरा चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ घेऊन येत आहेत. या चित्रपटात मैत्री-मस्तीची धमाल गोवा ट्रिप अनुभवयाला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 11:43 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • विजू माने घेऊन येतायत मैत्री-मस्तीची धमाल ट्रिप
  • ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न
  • ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या विषयांची आणि फ्रेश कंटेंटची एक वेगळीच लाट पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन निर्माते-दिग्दर्शकही वेगळ्या आणि वास्तवाशी जवळीक साधणाऱ्या कथा मोठ्या पडद्यावर आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर विजू माने आता प्रेक्षकांसाठी मैत्री, मस्ती आणि आठवणींचा जल्लोष घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा तरुणाईच्या भावविश्वाशी नाळ जोडणारा विषय घेऊन येत आहेत. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाच्या नावावरूनच मैत्री, गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि नात्यांमधील मोकळीक यांचा भन्नाट मेळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने तरुण प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘सेटवर सुरु झालेली कथा, अस्तित्वात उतरेल का ? ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ मध्ये रंगणार प्रेमाची अनोखी गोष्ट

चित्रपटाची कथा आणि कलाकारांची फळी अद्याप गुप्त ठेवण्यात आली असली तरी, शीर्षकच प्रेक्षकांना त्यांच्या मित्रांच्या ग्रुपसोबतच्या आठवणींमध्ये घेऊन जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा ग्रुप असतो, ज्याच्यासोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन केला जातो, पण तो अनेकदा अपूर्ण राहतो. अशाच भावनेवर आधारित ही कथा असल्याचं सूचित होतं आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना विजू माने म्हणाले की, “‘स्ट्रगलर साला’ला मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम माझ्यासाठी खूप खास आहे. त्या सीरिजमधील मैत्री आणि मस्ती लोकांच्या मनाला भिडली. त्याच भावनेतून ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ही कल्पना आकारण्यात आली. या चित्रपटातून प्रेक्षकांना मनमुराद हसण्याचा, मित्रांसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करून देणारा आणि थोडासा नॉस्टॅल्जिक अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. हलक्याफुलक्या शैलीत सांगितलेली ही कथा प्रत्येकाला आपलीशी वाटेल.”

Zee Natya Gaurav Puraskar 2026: “उत्सव रंगभूमीचा, सोहळा रंगकर्मींचा” दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

विजुमेनिया प्रायव्हेट (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आणि विजू माने लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मैत्रीचा रंगतदार जल्लोष, गोव्याच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी धमाल सफर आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा सिनेप्रवास प्रेक्षकांना केवळ हसवणारच नाही, तर भावनिकदृष्ट्याही जोडून ठेवणार आहे. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मैत्रीची मजा, तरुणाईचा उत्साह आणि आयुष्याच्या छोट्या-छोट्या आनंदांचा उत्सव अनुभवायला मिळणार आहे.

Web Title: Viju mane mamachya govyala jauya friendship marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
2

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
4

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.