(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी रंगभूमीचा वैभवशाली वारसा आणि समृद्ध परंपरा साजरी करणारा झी नाट्य गौरव पुरस्कार 2026 हा प्रतिष्ठित सोहळा यंदा २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रंगभूमीवरील उत्कृष्ट कलाकृती, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांचा सन्मान करणारा हा भव्य पुरस्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही तितक्याच दिमाखात आणि उत्साहात रंगणार आहे.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने दुसरा मुलगा काजूची दाखवली झलक; ‘गोला’ला क्यूटनेसमध्ये दिली टक्कर
या वर्षीच्या सोहळ्याची खासीयत म्हणजे मराठी नाटकांचा एक अविस्मरणीय प्रवास या मंचावर उलगडणार आहे. वर्षभर गाजलेल्या नाटकांची झलक, त्यांच्या मागील मेहनत आणि रंगभूमीवरील कलाकारांचे योगदान यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीवर आपली छाप सोडणाऱ्या दिग्गज नटसम्राटांची उपस्थिती या सोहळ्याला अधिकच भव्यता प्रदान करणार आहे.
या सोहळ्यात केवळ पुरस्कार वितरणच नाही, तर प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणीही असणार आहे. दमदार आणि रंगतदार नाट्यप्रवेश, विविध थीम्सवर आधारित ॲक्ट्स आणि नाट्यसृष्टीतील संस्मरणीय क्षणांचा आढावा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दिग्गज कलाकारांसोबतच नवोदित आणि प्रतिभावान कलाकारही आपल्या परफॉर्मन्सने रंगमंच उजळवणार असून, नव्या पिढीची ऊर्जा आणि सर्जनशीलता यंदाच्या कार्यक्रमात ठळकपणे दिसून येत आहे.
या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता शंकरर्षण करहाडे करणार असून, त्यांच्या खास शैलीत ते प्रेक्षकांचे मन जिंकणार आहेत. त्यांच्या विनोदी आणि उत्साही अँकरिंगमुळे कार्यक्रमाला एक वेगळाच रंग चढणार आहे. हा सोहळा केवळ पुरस्कारांचा नाही, तर मराठी नाट्यसृष्टीच्या संघर्षाचा, तिच्या यशाचा आणि तिच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा उत्सव आहे. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. झी नाट्य गौरव पुरस्कार २०२६ सोहळा २२ मार्चला प्रेक्षकांना सायं. ७ वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.






