(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. प्रेक्षक त्यांच्या आठवणीत अजूनही भावुक होताना दिसत आहे. तसेच आता ‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु तर राहील परंतु सर्वांच्या लाडक्या ‘पूर्णा आजी’ची भूमिके कोण साकारणार हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडला आहे. तसेच या मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी नव्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. आता ‘पूर्णा आजी’ला कोण रिप्लेस करणार याबद्दल सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले आहे.
सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?
ज्योती चांदेकर त्यांच्या अभिनयाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप कायम प्रेक्षकांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात राहिली आहे. ज्योती चांदेकर आता या जगात नाहीत, पण त्यांच्या भूमिकेचं काय होणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर ‘पूर्णा आजी’ म्हणून कोणत्या अभिनेत्रीचा विचार केला जाईल, असा प्रश्न सुचित्रा बांदेकर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. आणि याचे उत्तर सुचित्रा बांदेकर यांनी इतके सुंदर दिले कि चाहते आता त्यांचं देखील कौतुक करत आहेत.
सर्वप्रथम या प्रश्नावर सुचित्रा बांदेकर खूप भावुक झाल्या आणि म्हणाल्या, “हा न भरून निघणारा लॉस आहे. ज्योती चांदेकर या इतक्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी इतकी वर्षं काम केलं आहे आणि ‘पूर्णा आजी’ची अशी छाप सोडून गेल्या आहेत, ती भरून काढणं खूप कठीण आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “पण ‘शो मस्ट गो ऑन’… आम्हाला कोणत्याही एका कलाकाराला घेऊन हे काम करावं लागणार आहे, पण हे खूपच कठीण आहे.”
कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं की, सध्या ते कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत, कारण यातून सावरण्यासाठी त्यांना आणि प्रेक्षकांनाही वेळ हवा आहे. “ज्याप्रकारे चाहते कमेंट करत आहेत, प्रेक्षकही असं म्हणत आहेत की, ‘पूर्णा आजी म्हणून आम्ही दुसऱ्या कोणाला बघू शकत नाही.’ त्यामुळे या सगळ्याचा नीट विचार केला जाईल. मालिकेसाठी जे चांगलं असेल, ते आम्ही करू,” असे अभिनेत्रीने सांगितले आहे.
याआधी सुचित्रा यांनी ज्योती चांदेकर यांचा एक खूपच भावनिक किस्सा शेअर केला होता. जेव्हा त्या रुग्णालयात होत्या, तेव्हा त्या आदेश बांदेकरांना म्हणाल्या होत्या, “सुचित्राला सांग, हा मला रिप्लेस करू नको. ‘पूर्णा आजी’ मीच करणार!” यावरून त्यांच्या कामावर त्यांचा किती जीव होता, हे दिसून येतं. याचदरम्यान आता ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मालिकेचे निर्माते ‘पूर्णा आजी’च्या नव्या भूमिकेसाठी काय निर्णय घेतायत हे पाहणे बाकी आहे.