Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतमजुराचा मुलगा चमकला चंदेरी दुनियेत! ‘सुपर डुपर’ मधील अंशुमन मोरेच्या ‘कुकडू कू’ गाण्याने जिंकली रसिकांची मनं

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला नवा चित्रपट 'सुपर डुपर' चांगलाच चर्चेत आहे, नुकतेच या चित्रपटातील ल ‘कुकडू कू’ हे गाणं प्रदर्शित झाले, ज्यामुळे जळगावचा अहिराणी सुपुत्र अंशुमन मोरेचा आवाज घराघरात पोहोचला.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 28, 2026 | 09:11 PM
'सुपर डुपर' मधील अंशुमन मोरेच्या 'कुकडू कू' गाण्याने जिंकली रसिकांची मनं

'सुपर डुपर' मधील अंशुमन मोरेच्या 'कुकडू कू' गाण्याने जिंकली रसिकांची मनं

Follow Us
Follow Us:
  • झी स्टुडिओजचा नवा चित्रपट ‘सुपर डुपर’ लवकरचं प्रदर्शित होणार
  • चित्रपटातील ‘कुकडू कू’ गाण्यांमधून अंशुमन मोरेचा आवाज घराघरात पोहोचला
  • जाणून घ्या अंशुमन मोरेविषयी
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटातील ‘कुकडू कू’ हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्याची विशेष चर्चा रंगत आहे ती लहान गायक अंशुमन कैलास मोरेच्या आवाजामुळे. पहिल्याच मोठ्या संधीमध्ये अंशुमनने आपल्या सुरांनी अशी छाप पाडली की त्याचं नाव थेट रसिकांच्या ओठांवर आलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील विखरण गावचा अंशुमन अतिशय साध्या कुटुंबातून पुढे आला आहे. तो सध्या सरस्वती माध्यमिक विद्यालयात आठवीत शिक्षण घेत असून त्याचे आई-वडील शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती कठीण असली तरी त्याची गाण्यावरील आवड कधीच कमी झाली नाही. दोन लहान भावांसोबत वाढताना त्याने सातत्याने आपल्या कलेला धार दिली.

सिनेसृष्टीत कपूर आणि खान आडनाव असणे किती फायद्याचे? प्रसिद्ध अभिनेत्याच्याच तोंडून ऐका “Film आणि आडनावांचा खेळ”

अंशुमनचा संगीत प्रवास याआधीपासूनच सुरू असून त्याने अहिराणी भाषेत ‘चार वरिस ना प्यार’, ‘साजन तू बालम तू’, ‘सांग ना राणी’ आणि ‘कोना भरोसे सोडी गई’ अशी सुमारे ४० ते ५० गाणी गायली आहेत. त्याचं ‘राजा मना तू राजा रे’ हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं आहे.

‘कुकडू कू’ हे गाणं अंशुमनसाठी टर्निंग पॉइंट ठरलं. महाराष्ट्रभरातून झालेल्या निवड प्रक्रियेतून त्याची निवड झाली आणि मिळालेल्या या संधीचं त्याने सोनं केलं. एवढ्या लहान वयात मिळालेल्या या मोठ्या ब्रेकमुळे त्याच्या आवाजाची दखल संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने घेतली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.

या संधीबद्दल बोलताना अंशुमन म्हणतो की, Zee Studios कडून संधी मिळणं हे त्याच्यासाठी स्वप्नपूर्तीप्रमाणे आहे. मोठ्या कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. गावातून इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, पण कुटुंबाचा पाठिंबा कायम मिळाला. ‘कुकडू कू’ला मिळणारा प्रतिसाद पाहून तो आनंदी असून पुढेही चांगली गाणी गाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

‘Dhurandhar’साठी सारा अर्जुनचे ऑडिशन पाहून आदित्य धर झालं चकित, मुकेश छाबडांनी सांगितलं कास्टिंगचं कारण

‘सुपर डुपर’ या कौटुंबिक चित्रपटात अंशुमनच्या आवाजामुळे वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. पहिल्याच गाण्यात मिळालेलं यश आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, त्याच्या पुढील प्रवासाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, Zee Studios प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित Super Duper हा कौटुंबिक मनोरंजनपट येत्या ३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन Sameer Asha Patil यांनी केले असून निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे आहेत. तर छायांकन Sanjay Jadhav यांनी केले आहे.

Web Title: Zee studio new marathi film super duper farmers son anshuman more shines kukdu koo song wins hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • Marathi Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत
1

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
2

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
3

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.