Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार एका माणसाची कहाणी; ‘बजरंगी’चं पोस्टर चर्चेत

Bajrangi Marathi Movie: आगामी मराठी चित्रपट ‘बजरंगी’चे दमदार पोस्टर प्रदर्शित झाले असून, भव्य हनुमंताची मूर्ती, भगवे ध्वज, किल्ल्याची पार्श्वभूमी आणि मूर्तीकडे पाठ करून उभा असलेला तरुण यामुळे चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 26, 2026 | 02:53 PM
Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bajrangi Marathi Movie: भव्य हनुमंताच्या साक्षीने उलगडणार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बजरंगी’चे दमदार पोस्टर प्रदर्शित
  • सिद्धार्थ जाधव ‘बजरंगी’च्या भूमिकेत
  • श्रद्धा आणि अविश्वास यांच्यात अडकलेल्या एका माणसाच्या प्रवासाची
आगामी मराठी चित्रपट ‘बजरंगी’चे दमदार पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. भव्य हनुमंताची मूर्ती, तिच्यासमोर उभा असलेला एक तरुण, आजूबाजूला फडकणारे भगवे ध्वज आणि किल्ल्याची पार्श्वभूमी अशी लक्षवेधी दृश्यरचना पोस्टरमध्ये पाहायला मिळते. या भव्य मांडणीतून चित्रपटाच्या कथेला गूढ पार्श्वभूमी असल्याचे संकेत मिळतात. Bajrangi Marathi Movie:

महत्त्वपूर्ण घटनेची झलक

पोस्टरमध्ये विराट रूपातील हनुमंताची मूर्ती लक्ष वेधून घेते. तिच्यासमोर पाठ करून उभा असलेला तरुण हातात भगवा कपडा घेऊन उभा आहे. एका बाजूला भव्य हनुमंताचं रूप तर दुसरीकडे किल्ला, भगवे ध्वज आणि आकाशात पसरलेला सोनेरी प्रकाश, यामुळे पोस्टरला प्रभावी आणि सिनेमॅटिक रूप मिळाले आहे. या दृश्यातून या तरुणाच्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेची झलक मिळते.

Mushtaq Khan: ‘श्रीमंतांच्या लग्नात वेटरचं काम करतील पण…’मुश्ताकच्या अंतिम दर्शनाबाबत रझा मुरादने व्यक्त केली खंत

पोस्टरमधील या तरुणाचा हनुमंताशी नेमका काय संबंध आहे, त्याच्या आयुष्यात कोणता प्रसंग घडतो आणि या भव्य पार्श्वभूमीमागची कथा काय आहे, असे अनेक प्रश्न पोस्टर पाहिल्यानंतर निर्माण होतात. मात्र चित्रपटाच्या कथेचा फारसा उलगडा न करता निर्मात्यांनी ही उत्सुकता कायम ठेवली आहे.

कथेत नेमकं वळण काय?

‘बजरंगी’च्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव दिसणार असून त्याची ही भूमिका चित्रपटाच्या कथेत नेमकं काय वळण आणणार याची उत्सुकता आहे. सिद्धार्थ जाधव या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या अंदाजात येणार आहे.

‘बजरंगी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केलं असून, लेखन हेमंत एदलाबादकर यांचं आहे. अवंतिका सिने एंटरप्राइजेस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी काही महत्त्वाचे संकेत मिळत असले तरी त्यामागची संपूर्ण कथा आणि व्यक्तिरेखांचा प्रवास चित्रपटातूनच उलगडणार आहे.

Mushtaq Khan: ४ सप्टेंबरला केलं शेवटचं शूटिंग; पुढचे १० दिवस तब्येत खालावली, मुश्ताक खान यांच्या मुलाने सांगितला अखेरचा प्रवास

एका माणसाचा हा प्रवास

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणाले, “‘बजरंगी’ची कथा एका अशा प्रसंगापासून सुरू होते, जो स्वतःमध्येच अनेक प्रश्न निर्माण करतो. श्रद्धा आणि अविश्वास यांच्यात अडकलेल्या एका माणसाचा हा प्रवास आहे. या प्रवासातून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अनपेक्षित गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. पोस्टरमधून आम्ही कथेचा फारसा उलगडा न करता उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातून ही कथा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.”

Web Title: Bajrangi marathi movie siddharth jadhav poster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi movie
  • Marathi News
  • siddharth Jadhav

संबंधित बातम्या

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप
1

Raigad News: कर्जतमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; 424 बाप्पांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक
2

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी
3

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी

Mushtaq Khan: ४ सप्टेंबरला केलं शेवटचं शूटिंग; पुढचे १० दिवस तब्येत खालावली, मुश्ताक खान यांच्या मुलाने सांगितला अखेरचा प्रवास
4

Mushtaq Khan: ४ सप्टेंबरला केलं शेवटचं शूटिंग; पुढचे १० दिवस तब्येत खालावली, मुश्ताक खान यांच्या मुलाने सांगितला अखेरचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.