Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठीची तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना सांगणार ‘मना’चे श्लोक’, मोशन पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटही आली समोर

गणराज स्टुडिओ आणि 'संजय दावरा' एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 02, 2025 | 07:43 PM
मराठीची तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना सांगणार ‘मना’चे श्लोक’, मोशन पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटही आली समोर

मराठीची तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना सांगणार ‘मना’चे श्लोक’, मोशन पोस्टर प्रदर्शित; रिलीज डेटही आली समोर

Follow Us
Close
Follow Us:

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त आणि दर्जेदार चित्रपटांची चलती आहे. अशातच गणराज स्टुडिओ आणि ‘संजय दावरा’ एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गौरी स्प्रॅटला डेट करीत असलेल्या आमिर खानचे लग्नाबाबत वक्तव्य; म्हणाला, “दोन घटस्फोटांनंतर आता मला पार्टनरची…”

नुकताच या चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका खास दरवाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्या दरवाज्याचे एक दार निळे तर दुसरे लाल रंगाचे असून या दृश्यातून ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट मानवी मनाच्या खोल, गुंतागुंतीच्या भावनांचा शोध घेतो, हे स्पष्ट होते. अनेकदा चित्रपटात नायिकेसोबत एक किंवा दोन नायक पाहायला मिळतात, मात्र या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह सहा नायक दिसणार आहेत का असे हा व्हिडीओ पाहून वाटतेय. राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे सहा अभिनेते या चित्रपटात झळकणार आहेत. आता हे सहाही अभिनेते मृण्मयीचे नायक आहेत का? याचा उलगडा लवकरच होणार आहे.

‘The Traitors’ च्या रिलीज आधीच उर्फी जावेदने सांगून टाकली स्क्रिप्ट ? स्टोरी शेअर करत दिली हिंट

गणराज स्टुडिओज, संजय दावरा आणि नितीन वैद्य हे तिघेही नावाजलेले निर्माते या निमित्ताने एकत्र आले असून त्यांनी आजवर अनेक दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. फिल्म मेकिंगपासून ते फिल्म प्रदर्शनापर्यंतचा त्यांचा प्रवास लक्षवेधी आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. मृण्मयीने याआधी ही ‘मन फकीरा’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून प्रेक्षकांनी ‘मन फकीरा’ ला प्रचंड प्रेम दिले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून तीन निर्मात्यांसह मृण्मयी काहीतरी कमाल घेऊन येत आहे, असे दिसतेय. श्रेयश जाधव राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘बाबू बँड बाजा’ नंतर ‘मना’चे श्लोक’ मधून नवीन कथा घेऊन येत आहेत. ‘नाळ’ सारखा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना देणारे नितीन वैद्य या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. तसेच संजय दावरा या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असून ते या चित्रपटातून मराठी व्यावसायिक चित्रपटात पहिल्यांदाच निर्माता म्हणून पदार्पण करत असल्याने सगळ्यांनाच या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. ही सर्व मंडळी एकत्र आल्याने प्रेक्षकांना काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळेल हे नक्की.

चित्रपटाबद्दल मृण्मयी देशपांडे म्हणते, “दिग्दर्शक, लेखिका म्हणून हा माझा दुसरा चित्रपट आहे. ही माझ्या मनातलीच गोष्ट आहे, जी मी चित्रपटाच्या माध्यमातून साकारली आहे. यात माझ्यासोबत सहा गुणी अभिनेते आहेत. ज्यांच्यामुळे एक छान टीम जुळून आली आहे. एकंदरीत सगळेच खूप छान जमून आले आहे. म्हणूनच या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे.”

निर्माते संजय दावरा म्हणाले “गणराज स्टुडिओसोबत आणि मृण्मयीसोबत माझे जुने नाते आहे. ‘मना’चे श्लोक’ ही एक अनोखी संकल्पना आहे आणि मला वाटते मराठी चित्रपटसृष्टीत अशा प्रकारचा विषय पहिल्यांदाच मांडला जात आहे. या कथेवर मी आणि मृण्मयी अनेक दिवस काम करत होतो आणि आता आम्ही प्रदर्शनासाठी सज्ज आहोत. प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच भावेल, याची मला खात्री आहे.”

नितेश तिवारीच्या बिग बजेट चित्रपटात मोहित रैनाची वर्णी, चाहत्यांना देणार पुन्हा दर्शन

निर्माते श्रेयश जाधव म्हणतात, “खूप वेळानंतर एक उत्तम आशय व कथा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. मृण्मयीचे लेखन, दिग्दर्शनाची कामगिरी याआधी ही पाहिली आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळे व रंजक पाहायला मिळेल.”

प्रस्तुतकर्ता नितीन वैद्य म्हणाले, “मृण्मयी माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती एक उत्तम अभिनेत्री आणि दिग्दर्शिका देखील आहे. एक दिग्दर्शक म्हणून तिची कामगिरी मी याआधी पाहिली आहे, त्यामुळे तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी या चित्रपटाचा भाग झालो.”

Web Title: Mrunmayee deshpande rahul pethe pushkaraj chirputkar suvrat joshi siddhart menon marathi movie mana che shlok date announcement on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • marathi film
  • marathi movie

संबंधित बातम्या

लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’, सिद्धार्थ चांदेकर – मृण्मयी देशपांडेच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’, सिद्धार्थ चांदेकर – मृण्मयी देशपांडेच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी होणार रिलीज

आई–मुलाच्या नात्याला स्पर्श करणारा ‘उत्तर’चा दमदार ट्रेलर लाँच, सोहळ्याला तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थिती
2

आई–मुलाच्या नात्याला स्पर्श करणारा ‘उत्तर’चा दमदार ट्रेलर लाँच, सोहळ्याला तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थिती

लोककलेचा नवा संगम, महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत
3

लोककलेचा नवा संगम, महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत

‘After OLC ’चित्रपटाबद्दल मोठी अपडेट, चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार
4

‘After OLC ’चित्रपटाबद्दल मोठी अपडेट, चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.