Aamir Khan Speak About New Girlfriend Gauri Spratt Says I Was Who Will Met Me
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आमिर खानचा येत्या २० जूनला ‘सितारे जमीन पर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. आता तो थेट आता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय सध्या अभिनेता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता पुन्हा आमिर खान वयाच्या ६० व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेमामध्ये पडला आहे. तो एका ४६ वर्षीय महिलेला डेट करतोय. तिच्यासोबत अभिनेत्याने रिलेशनशिप जाहीर केल्यापासून अभिनेता कमालीचा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
‘The Traitors’ च्या रिलीज आधीच उर्फी जावेदने सांगून टाकली स्क्रिप्ट ? स्टोरी शेअर करत दिली हिंट
४६ वर्षीय गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर आमिर खान चर्चेत आहे. दोन घटस्फोटांनंतर आमिर खान आता गौरीसोबत पुन्हा रिलेशनशिपमध्ये आहे. नुकतंच त्याने एका मुलाखतीत गौरीबद्दल भाष्य केलं आहे. रिलेशनशिपबद्दल अभिनेत्याने मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. आमिरने ‘राज शमानी’ला दिलेल्या मुलाखतीत गौरीबद्दल भाष्य केलं आहे. किरण रावसोबत घटस्फोट झाल्यानंतर मी जाणूनबुजून लाईफ पार्टनरच्या शोधात नव्हतो, गौरीशी अचानक आणि अनपेक्षित माझी भेट झाली, असा त्याने मुलाखतीत खुलासा केला. किरण राव आणि रिना दत्ता या दोन्हीही एक्स वाईफसोबत त्याचं आता नातं कसं आहे, याचाही खुलासा त्याने केला.
नितेश तिवारीच्या बिग बजेट चित्रपटात मोहित रैनाची वर्णी, चाहत्यांना देणार पुन्हा दर्शन
प्रसिद्ध युट्यूबर ‘राज शमानी’ला दिलेल्या मुलाखतीत आमिरने खुलासा केला की, “गौरीला भेटण्यापूर्वी मला असं वाटत होतं की, माझं आता वय झालं आहे आणि आता या वयात मला कोण भेटणार? खरंतर, त्याचवेळी माझी थेरपीसुद्धा सुरू होती. त्या काळात मला थेरेपीने हे समजण्यासाठी खूप मदत केली की, मला आधी स्वत:वर प्रेम करण्याची गरज आहे, हे मी समजून चुकलो होतो. मला बरं व्हायचं होतं आणि मला माझ्या भावनिक आरोग्यावर काम करायचे होते. किरण आणि रिनासोबत माझं खूप स्ट्राँग आणि खोल नातं आहे. आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत आणि एकमेकांचा खूप आदर करतो. त्यांच्यासारखं नातं पुन्हा कोणासोबत जमेल असं मला वाटलं नव्हतं.”
Kamal Haasan: कर्नाटकातील उच्च न्यायालयात कमल हसन यांची धाव, नेमकं प्रकरण काय ?
गौरीसोबतची भेट कशी झाली, याविषयी सांगताना आमिर पुढे म्हणाला, “गौरी आणि माझी भेट चुकून झाली आणि आमच्यात चांगली मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते मलाही कळलं नाही. माझ्याकडे आई, मुलं, भावंडं आहेत, इतर अनेक जवळची नाती आहेत, त्यामुळे मला पार्टनर किंवा जोडीदाराची गरज नाही असं वाटलं होतं. पाणी फाऊंडेशनसाठी किरण आणि रिना अजूनही माझ्यासोबत काम करतात. आम्ही दररोज त्या कामासाठी भेटतो, बोलतो आणि एक कुटुंब म्हणून आमच्यात प्रेमाचा ओलावा आहे. आम्ही कायम एक कुटुंब म्हणून एकत्र राहू. आम्ही पती-पत्नी नसलो तरी एक कुटुंब नक्कीच आहोत. माझ्या आयुष्याचा आणि माझ्या कुटुंबाचा ते कायम भाग राहतील.”
बनावट AI Video वर पंकज त्रिपाठीने व्यक्त केले मत, म्हणाले- ‘मानवी भावनांचे महत्व संपत आहे…’
“घटस्फोटानंतरही माझं किरणशी नातं खूप चांगलं आणि जवळचं आहे. मला आठवतंय आमचा घटस्फोट झाल्यानंतर आम्ही ‘लाल सिंग चड्ढा’च्या शूटिंगसाठी लडाखला गेलो होतो आणि तिथे गावातल्या लोकांनी आम्हाला त्यांच्या एका सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावलं होतं. तिथे आम्ही एकत्र नाचलो. आमचा एकत्र नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यावरून अनेकांनी सवाल उपस्थित केले होते. आताच घटस्फोट झाला आणि हे दोघं एकत्र नाचतायत, असे कमेंट्स त्यावर होते. पण आमचं नातं कसं आहे याचं स्पष्टीकरण मी लोकांना देऊ शकत नाही. आमचं बंध खूप खास आहे. लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगदरम्यान तिने माझी खूप साथ दिली आणि लापता लेडीजच्या शूटिंगदरम्यान मी तिला खूप मदत केली. आमच्यातलं नातं खूप चांगलं आहे”, अशा शब्दांत आमिर व्यक्त झाला.