(फोटो सौजन्य - Instagram)
करण जोहरचा ‘द ट्रेटर्स’ हा रिॲलिटी शो लवकरच प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या शोमध्ये २० सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. जन्नत जुबैर, करण कुंद्रा, राज कुंद्रा, उर्फी जावेद, रफ्तार, द रिबेल किड उर्फ अपूर्वा मखीजा, जास्मिन भसीन, अंशुला कपूर, हर्ष गुजराल, महीप कपूर, सुधांशू पांडे, मुकेश छाब्रा, सुफी मोतीवाला आणि आशिष विद्यार्थी असे मोठे सेलिब्रिटी या शोमध्ये टिकून राहताना दिसणार आहे. तसेच हा शो प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवीन माध्यम ठरणार आहे.
Kamal Haasan: कर्नाटकातील उच्च न्यायालयात कमल हसन यांची धाव, नेमकं प्रकरण काय ?
उर्फीने तिच्या पोस्टद्वारे ‘द ट्रेटर्स’च्या कथेचा इशारा दिला?
‘द ट्रेटर्स’चा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या शो मध्ये असलेले सर्व स्पर्धक त्यांच्या शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, उर्फी जावेदनेही एक पोस्ट शेअर केली आहे आणि ‘द ट्रेटर्स’ बद्दल सांगितले आहे. तथापि, आता तिची एक पोस्ट मोठी सूचना देत असल्याचे दिसून येत आहे. जणू काही उत्साहात उर्फी जावेदने शो सुरू होण्यापूर्वीच चाहत्यांना त्याची स्क्रिप्ट सांगितली आहे. उर्फीची पोस्ट पाहिल्यानंतर, ‘द ट्रेटर्स’चा ट्रेलर पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात एकच गोष्ट येत आहे की शो मध्ये नक्की काय पाहायला मिळणार आहे.
उर्फी जावेदने केले टक्कल
ट्रेलरमध्ये, उर्फी जावेदने सर्वांसमोर म्हटले होते की जर ती गद्दार निघाली तर ती तिचे डोके मुंडवेल. आता या मोठ्या दाव्यानंतर, उर्फी जावेद तिच्या नवीनतम पोस्टमध्ये सलूनमध्ये बसलेली दिसत आहे. इतकेच नाही तर उर्फी जावेदने तिच्या सलूनमधील फोटो शेअर करताना जे लिहिले आहे ते तिचा दावा खोटा असल्याचे सिद्ध करत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्फीने लिहिले आहे की, ‘नमस्कार मित्रांनो, मी टक्कल करत आहे. ‘द ट्रेटर्स’ १२ जून रोजी प्रदर्शित होत आहेत. आणखी टेन्शन.’ असे लिहून तिने सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये टक्कलचा फोटो शेअर केला आहे.
बनावट AI Video वर पंकज त्रिपाठीने व्यक्त केले मत, म्हणाले- ‘मानवी भावनांचे महत्व संपत आहे…’
उर्फी जावेद आहे ट्रेटर्स?
आता उर्फी जावेदची ही पोस्ट पाहून असे वाटते की ती चाहत्यांना ती ३ गद्दारपैकी एक असल्याचा इशारा देत आहे. तथापि, उर्फी जावेद खरोखरच शो मधील गद्दार ठरेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही? पण तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते या शोसाठी नक्कीच उत्सुक होत आहे. प्रत्येकजण ‘द ट्रेटर्स’ सुरू होण्याची वाट पाहत आहे, कारण या शोची संकल्पना खूपच वेगळी दिसते आहे. कदाचित हा शो मोठा हिट ठरण्याची शक्यता आहे.