अभिनेत्री करूणा वर्माच्या घरातून लाखोंचे दागिने चोरीला; पोलिसांकडून तपास सुरू
प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि सिनेअभिनेत्री करूणा वर्मा यांच्याबद्दल एक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि सिनेअभिनेत्रीच्या घरी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री करूणा वर्मा यांनी आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. करूणा वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरात असलेल्या त्यांच्या चार सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत. चोरीचा संशय त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीवरती व्यक्त केला आहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
देवन्हावे येथे रंगला ‘खेळ महिलांचा उत्सव आनंदाचा’
अभिनेत्री करूणा वर्मा यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, अभिनेत्री मालाड पश्चिमेतील एव्हरशाईन नगरमधील न्यू आशीर्वाद इमारतीत एकटीच राहते. त्यांच्या घरातून चोरट्याने चार सोन्याच्या बांगड्या चोरल्या आहेत. प्रत्येकी ११ ग्रॅम वजन असलेल्या बांगड्याची एकूण किंमत ८८ हजार रुपये इतकी आहे. त्या बांगड्या अभिनेत्रीला तिच्या आईने २०१५ मध्ये भेट म्हणून दिल्या होत्या. तक्रारीमध्ये अभिनेत्रीने आपल्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अभिनेत्री त्या बांगड्या सहसा घालत नव्हती. त्या तिच्या बेडरूममधील एका ड्रॉवरमध्ये ठेवायच्या. अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने त्या बांगड्या शेवटच्या ९ मार्च रोजी पाहिल्या होत्या, त्यानंतर त्या तिला कुठेही सापडल्या नाहीत.
या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला तिच्या आई-वडिलांनी २०१५ मध्ये त्यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाला अभिनेत्रीला सोन्याच्या बांगड्या भेट म्हणून दिल्या होत्या. त्यांनी त्यांच्या बेडरूमच्या एका उघड्या ड्रॉवरमध्ये त्या चार बांगड्या ठेवल्या होत्या. अभिनेत्रीने त्या बांगड्या शेवटच्या ९ मार्च रोजी पाहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ड्रॉव्हर तपासला असता त्यात बांगड्या सापडल्या नाहीत. एका महिन्यापूर्वी, अभिनेत्रीने आपल्या घरात घरकामासाठी मोलकरणीला ठेवले होते. अभिनेत्री शुटसाठी बाहेर गेल्यावर ती मोलकरीण घरी एकटीच असायची. बांगूर नगर पोलीस सध्या मोलकरीण शांतीसह आणि इतर काही लोकांची चौकशी करीत आहेत. अभिनेत्री करूणा वर्मा या आठ महिन्यांपूर्वीच मालाड येथील घरात राहायला आल्या आहेत.
करूणा वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चोरीला गेलेल्या प्रत्येक बांगडीचे वजन ११ ग्रॅम इतकं आहे. अभिनेत्रीने १७ मार्च रोजी घरातील ड्रॉव्हरमध्ये बांगड्या शोधल्या. मात्र, तिला त्या सोन्याच्या बांगड्या सापडल्या नाहीत. त्यांनी मोलकरणीसह सर्वांकडे बांगड्यांबाबत चौकशी केली. अखेर त्यांनी 17 मार्च रोजी याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल केल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली. परिसरातील व इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणीही करण्यात आली. पण अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. मोलकरणीचीही चौकशी करण्यात आली असून बांगड्यांबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तिने चौकशीत पोलिसांना सांगितले आहे.