(फोटो सौजन्य - अकाउंट)
‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले, परंतु अलिकडेच नागपूरमधील हिंसाचारासाठी विकी कौशल आणि चित्रपटाच्या टीमला जबाबदार धरले जात आहे. या वादावर राजकीय विश्लेषक आणि ‘बिग बॉस १३’ फेम तहसीन पूनावाला यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विकी कौशल आणि ‘छावा’ टीमला पाठिंबा दिला आणि हिंसाचारासाठी चित्रपटाला जबाबदार धरणाऱ्यांवर टीका केली.
अभिनेता पूनावाला विकी कौशलच्या समर्थनार्थ उभा राहिला
‘छावा’ हा चित्रपट मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात १६८९ मध्ये संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करणाऱ्या मुघल शासक औरंगजेबाचे चित्रण आहे. चित्रपटानंतर अनेक लोकांमध्ये औरंगजेबाच्या विरोधात राग वाढला आहे. १७ मार्च रोजी नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, निदर्शनादरम्यान इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणचा अपमान झाल्याच्या अफवा पसरल्या, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. काही वेळातच दगडफेक आणि वाहने जाळण्याच्या घटना उघडकीस आल्या. काही लोक या संपूर्ण घटनेसाठी विकी कौशल आणि ‘छावा’च्या टीमला जबाबदार धरत आहेत.
IPL आधी हार्दिक पांड्या रुमर्स गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट, Viral Video ने वेधले सर्वांचे लक्ष!
It is utterly deplorable to pin the blame for the Nagpur riots on Vicky Kaushal’s stellar portrayal of Chhatrapati Sambhaji Maharaj or the blockbuster film Chhava. Art—be it a movie, a book, or any creative expression—does not wield the power to ignite violence; it is merely a… pic.twitter.com/qIZYfqJDoe
— Tehseen Poonawalla Official 🇮🇳 (@tehseenp) March 19, 2025
तहसीन पूनावाला यांनी दिला प्रतिसाद
तहसीन पूनावाला यांनी या आरोपावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, कोणत्याही चित्रपटाचा किंवा कलाकृतीचा उद्देश समाजाला दाखवणे असतो, हिंसाचार भडकवणे नाही. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘नागपूरमधील हिंसाचारासाठी विकी कौशल आणि ‘छावा’ सारख्या उत्तम चित्रपटाला जबाबदार धरले जात आहे हे खूप दुर्दैवी आहे.’ कला – मग तो चित्रपट असो, पुस्तक असो किंवा इतर कोणतेही माध्यम असो – ही केवळ समाजाचा आरसा आहे, ते दंगली भडकवण्याचे साधन नाही. जर एखाद्याला चित्रपट आवडत नसेल तर तो त्याकडे दुर्लक्ष करू शकतो किंवा त्यातून एक चांगला चित्रपट बनवू शकतो, परंतु हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाऊ शकत नाही.’ असे अभिनेत्याने म्हटले आहे.
पूनावाला यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि एका अभिनेत्रीवर थेट निशाणा साधला आणि म्हटले की, हे तेच लोक आहेत ज्यांनी औरंगजेबाचे गौरव केले होते, त्यानंतर काही उजव्या विचारसरणीच्या गटांनीही या मुद्द्यावर आगीत तेल ओतले. ते पुढे म्हणाले की, या नेत्यांचे कुटुंबीय आणि विशिष्ट वर्गाचे लोक कधीही रस्त्यावर येत नाहीत, परंतु त्याचे परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना भोगावे लागतात.
नागपूरमधील ताजी परिस्थिती
नागपूर हिंसाचारानंतर, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.