Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नाईशा’च्या ट्रेलरमध्ये भारतातील पहिले एआय संचालित सिनेस्टार्स

नाईशा ही बॉलीवूडमधली पहिली फीचर-लेंथ फिल्म आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे एआय संचालित व्हिज्युअल्स आहेत. नाईशा या उद्योगात क्रांतीची नांदी घेऊन येत आहे आणि सर्जनशीलता आणि टेक्नॉलॉजीच्या मर्यादा रुंदावते आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 28, 2025 | 03:21 AM
‘नाईशा’च्या ट्रेलरमध्ये भारतातील पहिले एआय संचालित सिनेस्टार्स

‘नाईशा’च्या ट्रेलरमध्ये भारतातील पहिले एआय संचालित सिनेस्टार्स

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ‘नाईशा’ सह एआय कथालेखनाचे नियम जणू नव्याने लिहीत आहे. नाईशा ही बॉलीवूडमधली पहिली फीचर-लेंथ फिल्म आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे एआय संचालित व्हिज्युअल्स आहेत. नाईशा या उद्योगात क्रांतीची नांदी घेऊन येत आहे आणि सर्जनशीलता आणि टेक्नॉलॉजीच्या मर्यादा रुंदावते आहे. या चित्रपटाचे बहु-प्रतीक्षित ट्रेलर नुकतेच आले आहे. या ट्रेलरमध्ये संपूर्णपणे एआय निर्मित मुख्य पात्रे नाईशा बोस आणि झैन कपूर दिसत आहेत. ही एक मनाची पकड घेणारी प्रेम कहाणी आहे, जी स्थळ-काळाच्या पलीकडे जाते.

‘पुढच्या जन्मी हा पती नको…’, सुनीताने गोविंदाबद्दल केले होते धक्कादायक वक्तव्य, घटस्फोटादरम्यान जुना Video Viral

बॉलीवूडच्या डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी ‘नाईशा’ एआय टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन कथा मांडणी सुधारते आणि दुसरीकडे आर्टिफिश्यल इंटेलिजन्स आणि मानवी भावना यांच्यातील अंतर कमी करते. अधिकृत ट्रेलरमध्ये एआय संचालित व्हिज्युअल्स, हृदयस्पर्शी कथानक आणि वेधक साऊंडट्रॅक आपल्याला खुणावतात. हा चित्रपट म्हणजे नवीन प्रकारचा सिनेमॅटिक अनुभव देण्यास वचनबद्ध असलेल्या अमेझिंग इंडियन स्टोरीज या नवीन एआय कंटेंट स्टुडिओचा पहिला उपक्रम आहे.

हा चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक विवेक अंचलिया यांनी आपले कथा मंडणीचे कौशल्य या अभूतपूर्व चित्रपटात दाखवले आहे. तिकडम (जिओ हॉटस्टार) चे दिग्दर्शन आणि राजमा चावल (नेटफ्लिक्स) च्या सह-लेखनाबद्दल प्रसिद्ध झालेल्या विवेक अंचलिया यांच्या मते ‘नाईशा’ हा बॉलीवूड द्वारे एआयच्या अंगिकाराच्या प्रक्रियेतील टर्निंग पॉइंट आहे.

विवेक अंचलिया म्हणाले, “‘नाईशा’द्वारे आम्ही मानवी कथाकथन आणि भारतीय संगीताची शक्ती यांचे एआय या तांत्रिक चमत्काराशी संयोजन करून लोकांना आवडेल अशी कथा सादर करत आहोत. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सिनेमा आणि डिजिटल एन्टरटेन्मेंट विकसित झाले आहेतच, पण ही एक संपूर्ण नवीन आघाडी आहे. काल जे अशक्य होते ते संभव बनवण्यासाठी एआय आम्हाला आमच्या कक्षा रुंदावण्यास मदत करत आहे.”

ते पुढे म्हणतात, “नाईशामध्ये आजच्या युगाच्या तरुणांची गोष्ट आहे. हा युवा वर्ग स्वातंत्र्य आणि आपल्या मुळांशी असलेले नाते यांच्या कात्रीत सापडला आहे. एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने आम्ही असे समकालीन विषय शोधत आहोत, जे तरुण भारतीयांना जवळचे वाटतील.

‘नाईशा’मध्ये विविध गीते आहेत, ज्यामध्ये चित्रपट उद्योगातील मोठमोठ्या हस्तींनी योगदान दिले आहे. अंधाधुन, जॉनी गद्दार, मेरी ख्रिसमस, बेलबॉटम, बवाल आणि अशा इतर काही चित्रपटाचा आरिजिनल स्कोअर रचणाऱ्या डॅनियल बी. जॉर्ज ने ‘मनमानियां’ आणि ‘रूहानियां’ (गायक- मधुवंती बागची, जिने स्त्री 2 मध्ये ‘आज की रात’ म्हटले आहे) ही दोन गाणी तयार केली आहेत. या व्यतिरिक्त, प्रोतीज्योती घोष आणि उज्ज्वल कश्यप यांनी अनुक्रमे ‘चीटर सैंया’ आणि ‘जाणे कहां’ ही गाणी कंपोझ केली आहेत. चित्रपटाची सांगीतिक बाजू बळकट करण्यात या प्रसिद्ध कलाकारांची महत्त्वाची भूमिका आहे.

ट्रेलरमध्ये नाईशा या स्वच्छंदी बंगाली-मिझो मुलीची आणि कोलकाता, पॅरिस आणि स्वित्झर्लंडपर्यंत मुशाफिरी करणाऱ्या झैन या एका बंडखोर रॅपरचा परिचय करून दिला आहे. भूतकाळ आणि भविष्य यांच्या ओढाताणीत अडकलेल्या या दोन जीवांची पुनर्भेट होते तेव्हा प्रेम, पॅशन आणि ओळख यांचे सत्य त्यांच्या समोर येते. पोरी भुयान, श्वेता शर्मा अंचलिया आणि जोसेफ फ्रँकलीन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि हा चित्रपट एआय प्रेरित चित्रपटांचे नवे युग सुरू करत मे २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘दोन हृदयाने प्रेम पहिले, धर्म नाही…’, सोनाक्षीने झहीरसोबतच्या आंतरजातीय विवाहावर सोडले मौन!

Web Title: Naisha trailer features indias first ai powered movie stars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 03:21 AM

Topics:  

  • entertainment
  • movie

संबंधित बातम्या

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
1

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म
2

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
3

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड
4

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.