(फोटो सौजन्य - x अकाउंट)
गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून गोविंदा त्याची पत्नी सुनीता हिच्यापासून घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या येत समोर येत आहेत. असे म्हटलं जात आहे की ते दोघेही त्यांचे ३७ वर्षांचे वैवाहिक जीवन संपवणार आहेत. हे पाहून सर्व चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या जोडप्याचे वकील ललित बिंदल यांनी पुष्टी केली की सुनीता यांनी सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता परंतु आता दोघांमध्ये समेट झाला आहे आणि ते पुन्हा एकत्र आहेत. दरम्यान, सुनीता यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. जी सोशल मीडियावर आता चर्चेचा विषय बनली आहे.
Sikandar Teaser: ‘कायदे में रहो तो फायदे में राहोगे’, ‘सिकंदर’चा टीझर प्रदर्शित होताच करतोय ट्रेंड!
गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, सुनीताचा एक जुना मुलाखत व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने म्हटले आहे की तिला पुढच्या जन्मात गोविंदा तिचा नवरा नको आहे. ती म्हणाली, ‘मी त्याला सांगितले आहे की पुढच्या जन्मात माझा नवरा बनू नकोस.’ तो कधीही सुट्टीवर जात नाही. मी अशा प्रकारची व्यक्ती आहे जिला माझ्या पतीसोबत बाहेर जाऊन रस्त्यावर पाणीपुरी खायची इच्छा असते. तो नेहमी कामात व्यस्त असायचा. आम्ही दोघांनी कधी एकत्र चित्रपट पाहिल्याचे मला आठवत नाही. प्रेम आंधळं असतं, आता डोळे उघडत आहेत.’ असे म्हणताना दिसत आहे.
गोविंदा अनेकदा त्याच्या अफेअर्समुळे चर्चेत राहिला आहे. घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये, असे म्हटले जात होते की अभिनेता त्याच्यापेक्षा ३१ वर्षांनी लहान असलेल्या एका मराठी अभिनेत्रीला डेट करत आहे. रेडिटवरील एका वृत्तानुसार, ही अभिनेत्री ३० वर्षांची असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या अभिनेत्रीचे नाव उघड करण्यात आले नाही. त्याच वेळी, सुनीता आणि अभिनेता गोविंदा यांनी या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि या अफवांमध्ये किती तथ्य आहे हे सांगणे देखील कठीण आहे.
‘दोन हृदयाने प्रेम पहिले, धर्म नाही…’, सोनाक्षीने झहीरसोबतच्या आंतरजातीय विवाहावर सोडले मौन!
इंडिया टुडेशी बोलताना, या जोडप्याचे वकील ललित बिंदल म्हणाले की, ‘सुनीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवले आणि आता ते एकत्र आहेत. बिंदल म्हणाले, ‘आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे.’ जोडप्यांमध्ये अशा गोष्टी घडतात, परंतु ते दृढतेने पुढे जात आहेत आणि नेहमीच एकत्र राहतील.