
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नॅशनल अवॉर्ड विजेते अल्लू अर्जुन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. त्याच्या करिष्माई व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार ऑन-स्क्रीन उपस्थितीमुळे तो देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया आयकॉन म्हणून त्याला प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम, सन्मान आणि कौतुक मिळत आहे.
लार्जर-दॅन-लाईफ स्टारडम असतानाच अल्लू अर्जुन हा एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व देखील आहे. कुटुंबासोबत घालवलेले क्षण तो नेहमीच खास मानतो. याचा सुंदर प्रत्यय नुकताच आला, जेव्हा त्याने आपल्या वडिलांना आणि ज्येष्ठ निर्माते अल्लू अरविंद यांच्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय भावूक संदेश शेअर केला.
सोशल मीडियावर वडिलांसोबतचा एक प्रेमळ फोटो शेअर करत अल्लू अर्जुन याने लिहिले,“हॅप्पी बर्थडे, डॅड. माझ्या आयुष्यात देवाच्या सर्वात जवळ कोणी असेल, तर ते तुम्ही आहात. तुम्ही नेहमी आनंदी आणि निरोगी आयुष्य जगो.
याशिवाय, अल्लू अर्जुन याने जागतिक बॉक्स ऑफिसवर १८०० कोटी रुपयांचा लाइफटाइम कलेक्शनचा टप्पा गाठत कलेक्शन चार्टवर आपले वर्चस्व कायम राखले आहे, जो आतापर्यंतचा एक ऐतिहासिक विक्रम मानला जात आहे. या ब्लॉकबस्टर यशाच्या जवळ कोणती फिल्म पोहोचू शकेल का, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुन याच्या आगामी प्रोजेक्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे. आयकॉन स्टार पुढे जो काही मोठ्या पडद्यावर घेऊन येतील, ते भव्य, दमदार आणि ऐतिहासिकच असणार आहे.
अल्लू अर्जुन नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी वेगळं आणि मोठं घेऊन येतो. त्यामुळे “Experience the Extraordinary” हा फक्त एक डायलॉग नसून, त्याच्या पुढील प्रवासाचा संकेत असण्याची शक्यता अधिक आहे. भव्य स्केल, नवे प्रयोग, दमदार कथा आणि त्याची खास स्टाईल हे सगळं एकत्र आलं, तर प्रेक्षकांसाठी तो अनुभव खरंच ‘एक्स्ट्राऑर्डिनरी’ ठरेल. आता अल्लू अर्जुन नेमकं काय घेऊन येणार, याची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे चाहत्यांची उत्सुक नजर लागून आहे. मात्र एक गोष्ट नक्की आयकॉन स्टारचा पुढचा प्रोजेक्ट मोठ्या पडद्यावर आला, तर तो भव्य, दमदार आणि चर्चेत राहणारा असणार, यात शंका नाही.