(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राचं तुफान 11 जानेवारीपासून थेट घराघरांत शिरण्यासाठी सज्ज झालं आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ अखेर उद्यापासून सुरू होत आहे. या भव्य ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना पहिल्याच क्षणापासून भेटणार आहे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीचा लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख. आपल्या खास स्टाइलमध्ये, विनोदाची फटकार आणि गरज पडल्यास कडक भूमिकेत दिसणारे रितेश देशमुख यंदाही बिग बॉसच्या घरातल्या खेळाला दिशा देणार आहेत.
रितेश भाऊंच्या या खेळात कोण कोण राडा घालायला सज्ज आहे. हे आता काही तासांतच समजणार आहे.यासोबतच त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने ग्रँड प्रीमियरला मिळणार आहे जबरदस्त एनर्जी आणि ग्लॅमरची झलक, जी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. नवे पर्व, नवा खेळ आणि नवे चेहरे… बिग बॉस मराठी सीझन ६ येत्या ११ जानेवारी पासून रात्री ८ वाजता कॉलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच हा शो जिओ हॉटस्टारवर देखील प्रसारित केला जाणार आहे.
याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच कलर्स मराठीने ‘बिग बॉस’चे काही प्रोमो शेअर करण्यास सुरूवात केली आहे. ज्यामध्ये स्पर्धकांची झलक चाहत्यांना दिसली आहे. ही पोस्ट पाहून इंटरनेटचा पारा चढवला आहे. आणि सगळे ‘बिग बॉस’ प्रेमी पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आहेत.ग्रँड प्रीमियरपूर्वी प्रदर्शित झालेल्या सहभागींच्या अनरिव्हील प्रोमोनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. कुणी सौंदर्य आणि अदा घेऊन येणारं फूलनदेवी रूप, कुणी कातिल डान्स मूव्ह्जने घायाळ करणारी अदा, तर कुणी घरात धुमाकूळ घालणारी दमदार एन्ट्री या झलकांमधून अनेक नावांवर चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर “हे सहभागी नेमके कोण?” असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात असून अंदाजांचे खेळ रंगले आहेत.
अनेक स्पर्धकांची नावं समोर आल्यानंतर या घरात आणखी कोण कोणते स्पर्धक एन्ट्री करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ येत्या ११ जानेवारी पासून रात्री ८ वाजता कॉलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच हा शो जिओ हॉटस्टारवर देखील प्रसारित केला जाणार आहे.






