Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याला झालेला ब्रेन हॅमरेज, एकनाथ शिंदेंच्या पुढाकारामुळे कलाकाराने केली गंभीर आजारावर मात

आज आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या अभिनेता विकास समुद्रेचा वाढदिवस आहे. काही मोजकेच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारा हा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीतून अचानक कसा गायब झाला ? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 01, 2025 | 07:07 PM
'नवरा माझा नवसाचा' फेम अभिनेत्याला झालेला ब्रेन हॅमरेज, एकनाथ शिंदेंच्या पुढाकारामुळे कलाकाराने केली गंभीर आजारावर मात

'नवरा माझा नवसाचा' फेम अभिनेत्याला झालेला ब्रेन हॅमरेज, एकनाथ शिंदेंच्या पुढाकारामुळे कलाकाराने केली गंभीर आजारावर मात

Follow Us
Close
Follow Us:

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर स्टारर ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. २००४ साली रिलीज झालेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आजही चाहते तितक्यात आवडीने पाहतात. हा कॉमेडी चित्रपट मुंबई ते गणपतीपुळे बस प्रवासादरम्यान झालेल्या गंमतीमुळे चित्रपटाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या बस प्रवासामध्ये एक कोकणी कुटुंब दाखवलं आहे. बस प्रवासात ऑनस्क्रिन बायकोसोबत प्रवास करणाऱ्या अभिनेता विकास समुद्रेने चाहत्यांचं मन जिंकलं. पण गेल्या काही वर्षांपासून विकास अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.

गायक कैलाश खेर यांनी गाण्यातून दिला स्वच्छतेचा नारा, ‘स्वच्छ भारत’ गाणं प्रदर्शित

आज आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या अभिनेता विकास समुद्रेचा वाढदिवस आहे. काही मोजकेच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारा हा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीतून अचानक कसा गायब झाला ? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकणारा विकास गेल्या काही वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. एका गंभीर आराजाशी झुंज लढत असल्यामुळे विकास फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होता. मिळालेल्या माहितीनुसार, विकासला ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजारानं ग्रासलं होतं. २०१८ मध्ये अभिनेत्याला आजाराचं निदान झालं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे उपचारांसाठी पैशांची चणचण देखील अभिनेत्याला भासत होती.

ऐश्वर्या राय अभिषेकला कशी ठेवते नकारात्मकतेपासून दूर? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

अभिनेत्याकडे आर्थिक चणचण असल्यामुळे त्याला मदतीचा हात म्हणून अनेकांनी मदत केली. विकास या गंभीर आजारातून सुखरूप बाहेर पडला. यासाठी विकासला एकनाथ शिंदे यांनीही मोठी मदत केली होती. त्यानंतर आरामासाठी तो काही काळ मनोरंजनसृष्टी पासून दूर राहिला. त्यानंतर अभिनेत्याने संतोष पवार दिग्दर्शित ‘सुंदरा मनात भरली’ या नाटकातून दुहेरी भूमिका साकारत इंडस्ट्रीमध्ये दमदार पदार्पण केले. आजारपणाबद्दल अभिनेता एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, “आजारपणाचा काळ फार कठीण होता. अनेक गोष्टींना मी मुकलो‌. प्रकृतीच्या काळजीने अभिनयाबरोबरच दिग्दर्शक म्हणूनही रसिक सेवा करणार आहे. गेली 20-22 वर्ष प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले ते असेच असावे. रसिकांचे प्रेम आणि शुभेच्छांमुळेच मी पुन्हा उभा राहतो आहे.”

‘मना’चे श्लोक’चे भन्नाट पोस्टर प्रदर्शित, दोघांचं नेमकं नातं काय ?

अभिनेता विकास समुद्रेच्या कामाबद्दल बोलायचं तर, ‘नवरा माझा नवसाचा’ या सुपरहिट चित्रपटात त्याने चिपळूणकर प्रवासाची भूमिका साकारलेली. याशिवाय कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु यांसारख्या विनोदी शो मध्ये त्याने अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकले. याशिवाय झकास, यदाकदाचित, नाय नो नेव्हर आणि छंद प्रीतीचा धमाल भूमिका साकारल्या.

Web Title: Navra maza navsacha fame actor vikas samudre won battle with brain hemorrhage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक
1

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर
2

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’,  ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
3

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’, ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मराठी शाळा आणि मातृभाषा जपण्यासाठीच्या लढ्याची हाक! ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ ‘हाकामारी’ गाणं प्रदर्शित
4

मराठी शाळा आणि मातृभाषा जपण्यासाठीच्या लढ्याची हाक! ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ ‘हाकामारी’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.