फोटो सौजन्य: एक्स (ट्वीटर)
सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा विशाल सोहळा असणारा ‘महाकुंभमेळा’सुरू आहे. या महाकुंभमध्ये देशासह जगभरातून करोडो भाविक गंगास्नान करण्यासाठी उपस्थित राहत आहेत. देशातील विविध भागांतून मोठ्या संख्येने या महाकुंभात साधू– संत, सामान्य नागरिकांसह राजकीय, मनोरंजन आदी विविध क्षेत्रातील मंडळी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. बॉलिवूडसह मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्तानंतर आता अभिनेत्री नीना गुप्ता हिने आणि अभिनेता राजकुमार राव ह्यानेही आज महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.
हजेरी लावल्यानंतर अभिनेत्री नीना गुप्ता हिने एएनआयसोबत संवाद साधला. मुलाखती दरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता म्हणाली की, ” माझा महाकुंभातील अनुभव फार अनोखा होता. गेल्या अनेक वर्षांपासून माझी महाकुंभामध्ये येण्याची इच्छा होती आणि अखेर ती इच्छा माझी यावर्षी पुर्ण झाली आहे. आज मी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे, अनुभव फारच विलक्षण होता. येथील वातावरणही फार खिळीमिळीचं आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही इतका मोठा मेळावा पाहिलेला नाही. इतका मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी उत्तरप्रदेश सरकारचे मनापासून आभार मानते.”
महाकुंभ मेळ्यात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने केलं पवित्र स्नान; म्हणाला – ‘हा दैवी आशीर्वाद…’
महाकुंभमेळा पवित्र नद्या गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचा संगम असलेल्या ठिकाणी आयोजित केला जातो. त्या ठिकाणाला त्रिवेणी संगम म्हणून संबोधले जाते. उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ६ फेब्रुवारीपर्यंत, प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये ३९७.४ दशलक्षाहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीच्या पवित्र त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केले आहे. महाकुंभ सुरू असताना, लाखो लोकांची प्रचंड श्रद्धा आणि भक्ती या भव्य कार्यक्रमाचे आध्यात्मिक महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
“‘छावा’चा भाग होण्यासाठी मी स्वतःला…”, चित्रपटाबद्दल सुप्रसिद्ध कथा- पटकथाकार काय म्हणाले ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी त्रिवेणी संगमामध्ये पवित्र स्नान केले आहे. इतर उल्लेखनीय व्यक्तींमध्ये राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन राम मेघवाल, भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी, राज्यसभा खासदार सुधा मूर्ती, आसाम विधानसभेचे अध्यक्ष विश्वजीत दैमारी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांचाही समावेश आहे. बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला आहे, ज्यात अभिनेत्री हेमा मालिनी, अनुपम खेर, भाग्यश्री आणि मिलिंद सोमण, तसेच कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, कोरियोग्राफर रेमो डिसूझा आणि किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांचा समावेश आहे.