Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेश- जिनिलियाने वेगळ्या पद्धतीने मानले प्रेक्षकांचे आभार, ‘वेड’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर दिली ‘ही’ खास भेट, सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडलाय असा प्रकार

‘वेड’ चित्रपटात आता सत्या(रितेश देशमुख) आणि श्रावणी(जिनीलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं ‘वेड तुझे..’ या गाण्याचं नवं व्हर्जन (Ved Tujha Song New Version) सामिल करण्यात येणार आहे. सोबत काही नवे सीन्सही चित्रित करून सामिल करण्यात आले आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी,२०२३ पासून चित्रपटगृहात ‘वेड’ पाहताना आता या नव्या गाण्याचा आनंदही प्रेक्षक लुटू शकणार आहेत.

  • By साधना
Updated On: Jan 17, 2023 | 05:46 PM
riteish and genelia deshmukh in ved

riteish and genelia deshmukh in ved

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई फिल्म कंपनी (Mumbai Film Company) निर्मित आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित ‘वेड’ (Ved) चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. चित्रपटानं आता ५० कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. वेड चित्रपटाची कथा,संवाद,गाणी असं सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय,दिग्दर्शन आणि निर्मिती मूल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं ‘वेड’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.  त्यामुळे आता वेळ आहे एक पाऊल पुढे जाण्याची. काहीतरी नेहमीपेक्षा हटके करण्याची असा विचार चित्रपटाच्या टीमने केला.

लोकाग्रहास्तव ‘वेड’ चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच रितेश-जिनीलियाच्या ‘वेड’ चित्रपटामुळे घडून येणार आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात सामिल केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर अगदी बॉलीवूड,टॉलीवूडमध्ये देखील हे घडलं नव्हतं. पण ‘वेड’ चित्रपटात आता सत्या(रितेश देशमुख) आणि श्रावणी(जिनीलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं ‘वेड तुझे..’ या गाण्याचं नवं व्हर्जन (Ved Tujha New Version) सामिल करण्यात येणार आहे. सोबत काही नवे सीन्सही चित्रित करून सामिल करण्यात आले आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी,२०२३ पासून चित्रपटगृहात ‘वेड’ पाहताना आता या नव्या गाण्याचा आनंदही प्रेक्षक लुटू शकणार आहेत.

रितेश-जिनीलिया हे जोडपं केवळ ऑन स्क्रीन नाही तर ऑफ स्क्रीनही चाहत्यांचं फेव्हरेट आहे. त्यामुळे नेहमीच त्यांना एकत्र पाहणं सगळ्यांना आवडतं. ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आणि पुन्हा एकदा प्रेक्षक यांच्या केमिस्ट्रीच्या प्रेमात पडले. रितेशनं साकारलेला ‘सत्या’ आणि जिनीलियानं साकारलेली ‘श्रावणी’ सर्वांनाच आपलं वेड लावून गेली. त्यामुळे आता दोघांवर नव्यानं चित्रित केलेलं वेड तुझे हे गाणं देखील सर्वांची वाहवा मिळवून जाणार यात शंका नाही. चित्रपटात आधी ‘वेड तुझे..’ हे गाणं रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. त्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली. त्यामुळे आता रितेश-जिनीलियाच्या ‘वेड तुझे..’ या गाण्याच्या नव्या व्हर्जनला देखील रसिक चाहते उचलून धरतील अशी आशा आहे.

[read_also content=”एका तिकिटात डबल धमाल, एकाचवे‌ळी मोठ्या पडद्यावर दिसणार रणबीर आणि शाहरुख खान, कसं ते जाणून घ्या https://www.navarashtra.com/entertainment/tu-jhoothi-main-makkar-trailer-to-be-released-in-pathaan-show-nrsr-362440/”]

‘वेड’ चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आणि त्याक्षणी अजय-अतुलच्या संगीतानं नेहमीप्रमाणे रसिकांवर मोहिनी घातलेली आपण पाहिली. चित्रपटातील गाण्यांना अल्पावधीत उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत याचं पूर्ण श्रेय अर्थातच आपले लाडके संगीतकार अजय-अतुल यांना जातं. सोशल मीडियावर तर ‘वेड’ चित्रपटातील गाणी अजूनही ट्रेन्डिंगवर आहेत. ‘वेड लागलं…’ या गाण्यावर तर रील्सचा पाऊस अजूनही तितकाच वेगानं पडताना दिसत आहे. त्यामुळे आता रितेश-जिनीलियावर चित्रित झालेलं ‘वेड तुझे..’ गाण्याचं नवं व्हर्जन चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट ठरणार हे नक्की.

Web Title: New version of ved tujha song will be included in ved movie nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2023 | 05:26 PM

Topics:  

  • Entertainment News
  • genelia deshmukh
  • Marathi News
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी
1

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ
2

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Dombivli Potholes: डोंबिवलीतील नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; मोठागाव-रेतीबंदर रोडची दुरुस्ती सुरू
3

Dombivli Potholes: डोंबिवलीतील नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; मोठागाव-रेतीबंदर रोडची दुरुस्ती सुरू

Top Marathi News Today: विदर्भात मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
4

Top Marathi News Today: विदर्भात मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.