Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

अकोले तालुक्यात अनधिकृत लॅबचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तालुक्यात 19 पॅथॉलॉजी लॅब अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत लॅबला डॉक्टरांची देखील साथ होती.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 23, 2026 | 09:19 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

आदिवासी भागासह बागायती पट्टयातील अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी रूग्णालयात दाखल होतात. मात्र रक्त, लघवीसह इतर तपासण्यांसाठी रुग्णांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या तालुक्यातील अनेक पॅथॉलॉजी लॅब अनधिकृत आहेत. अकोले तालुक्यात केवळ दोन एमडी अधिकृत पॅथॉलॉजी लॅब असून तब्बल १९ पॅथॉलॉजी लॅब अनधिकृत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना देव समजल्या जाणाऱ्या रुग्णांची तेच डॉक्टर व अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबच्या संगनमताने शुद्ध फसवणूक करत आहेत.

अकोलेच्या आरोग्य विभागाला भरघोस आर्थिक डोस मिळत असल्याने ते हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवून गपगुमान आहेत. अकोले तालुक्यातून ग्रामीण व शहरी भागात अनधिकृत पॅथॉलॉजी व लॅबरोटरीच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. एमबीबीएस नंतर एम. डी. (पॅथॉलॉजी) किंवा डीपीबी, डीसीपी, डीएनबी (पॅथॉलॉजी) व तत्सम पदवी प्राप्त नसेलेल्यांनी दुकाने थाटली आहेत. नियमानुसार शासनमान्य डीएमएलटी पदविका प्राप्त पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन हाच रक्त, लघवी नमुना तपासणी करू शकतो. पण परवानगी नसलेले काही स्वतःचः पॅथॉलॉजीच्या स्वाक्षरीसह रिपोर्ट देत आहेत.

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु

चुकीच्या अहवालाने उपाचारही चुकीचे

  • पॅथोलॉजी लॅब व क्लिनिकल लेबोरेटरीतील प्रत्येक व्यक्ती संबंधित विद्याशाखेचा तसेच नोंदणीकृत असायला हवा
  • चुकीच्या अहवालामुळे चुकीच्या उपचाराला नागरिक बळी पडतात
  • लुटमारीला आळा घालून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
  • लॅब बेकायदेशीर असूनही डॉक्टर अशा बेकायदेशीर लॅबचे अहवाल कसे स्वीकारतात ?
  • तपासणी शुल्कची मनमानी आकारणी

लेखी रिपोर्ट मागितल्यास उडवाउडवीची उत्तरे

काही लॅबचालक अनेकदा तोंडीच रिपोर्ट सांगतात, लेखी रिपोर्टची मागणी केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात.
काही लॅबचालक रिपोर्ट देताना दिशाभूल करण्यासाठी रिपोर्टच्या डाव्या कोपऱ्यात मोठ्या अधिकृत लॅबच्या नावाचाही वापर करतांना दिसतात.

अकोले शहरासह राजूर, कोतुळ, शेंडी, देवठाण, ब्राम्हणवाडा, लिंगदेव, समशेरपूर परिसरात अनधिकृत पॅथॉलॉजी व लॅबोरेटरीचा सुळसुळाट झाला आहे.

Mumbai Pune Expressway: काय सांगता! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी, पण ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य

संसर्गजन्य आजाराचे सकट समोर असताना अशा अनधिकृत लॅबधारकांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तालुक्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय सागितले? 

अकोले तालुक्यातील पॅथॉलॉजी लॅब धारकांची नोंदणी असलेल्या पॅथॉलॉजी लॅबची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत संग्रहित करण्यात येईल. ती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती अकोले तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी, डॉ. शामकांत शेटे यांनी दिली.

Web Title: Ahilyanagar akole illegal labs rising doctors support health department negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.