Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती

संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्था निर्मित कलाकृती ‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ हे आगामी नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विचार करायला भाग पाडणारी नाट्यकृती चर्चेत येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 24, 2026 | 10:37 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा
  • मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणार कथा
  • प्रभावी कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस
 

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ या शीर्षकाने सादर झालेल्या नव्या नाट्यकृतीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी, इतिहासाशी आणि भावनांशी थेट नातं जोडणारा विषय या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रप्रेमी प्रेक्षकांकडून या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

संस्कृती कला प्रतिष्ठान आणि लोकजागर नाट्य संस्था निर्मित या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संदिप जंगम यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या विविध घटनांचा आढावा घेत, त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि मराठी अस्मितेचा अभिमान या नाटकातून जिवंत केला जातो. इतिहासातील त्या निर्णायक क्षणांना रंगमंचावर अनुभवताना प्रेक्षक भारावून जाणार आहेत.

Dhurandhar 2: रजनीकांत यांचे कौतुक ऐकून भावूक झाला Aditya Dhar; पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या मनातील भावना

नाटक पाहताना एकीकडे पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि मुंबईसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या कथा मनाला भिडतात. त्याचबरोबर आजच्या काळातील वास्तव परिस्थितीवरही हे नाटक भाष्य करते. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात मराठी माणसाचं स्थान नेमकं काय उरलं आहे, हा प्रश्न ठळकपणे मांडला जाणार आहे.

गावागावातून मुंबईत येऊन आपल्या कष्टाने ही नगरी उभी करणाऱ्या मराठी माणसाची ओळख आज बदलत चालल्याचं चित्र या नाटकातून उभं राहतं. “मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” असा ठाम संदेश देत, आजच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर विचार करायला भाग पाडणारा हा प्रयोग आहे. गिरगाव, लालबाग, परळ, दादर यांसारख्या पारंपरिक मराठी वस्तींच्या भागात आज मराठी माणूस किती उरलाय, हा सवालही नाटक प्रभावीपणे उपस्थित करतं आहे.

दिग्दर्शकाने रंगमंचीय मांडणीमध्ये नाट्य, दृश्य आणि तंत्रज्ञानाचा सुंदर संगम साधला आहे. विशेष म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून सादर केलेले दृश्य नाटकाला एक वेगळाच आयाम देतात. या आधुनिक सादरीकरणामुळे प्रेक्षकांना नाट्यचित्र माध्यमाचा एक नवीन आणि समृद्ध अनुभव मिळतो. आदेश बांदेकर आणि उदय सबनीस यांच्या निवेदनामुळे नाटकाला अधिक वजन प्राप्त झालं आहे.

BO Collection: Dhurandhar 2 ने अवघ्या पाच दिवसात गाठला ५०० कोटींचा टप्पा; जाणून घ्या एकूण कलेक्शन

या नाटकाला रोहन पाटील यांचं संगीत, राजेश शिंदे यांची प्रकाशयोजना आणि प्रसाद सोनावणे आणि हर्ष राऊत यांनी साकारलेल्या AI चित्रफितींचा प्रभावी आधार लाभला आहे. शाहीर मनोहर गोलांबरे आणि रविंद्र खोमणे यांच्या गायनाने वातावरण अधिक जिवंत होतं. गणेश जाधव आणि संदिप जंगम यांच्या अभिनयामुळे नाटक अधिक प्रभावी बनतं.

या नाट्यकृतीची निर्मिती महेश भोसले आणि संदिप जंगम यांनी केली असून, व्यावसायिक रंगभूमीवर आशयघन आणि विचारप्रवर्तक विषय हाताळण्याचा हा एक कौतुकास्पद प्रयत्न आहे. मराठी इतिहास, संस्कृती आणि अस्मिता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्व लक्षात घेता, प्रेक्षकांनी या नाटकाचा आवर्जून आस्वाद घ्यावा आणि पुढील पिढीलाही हे नाटक दाखवावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Marathi natak maharashtra maza mumbai kunachi review story marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
2

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
3

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
4

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.