Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

नवरात्रीत मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा अल्ट्रा झकास ओटीटीवर पाहाता येणार अनोखा उत्सव!

  • By अमृता यादव
Updated On: Sep 30, 2025 | 06:59 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ रंग आणि नऊ रूपं, या अनोख्या संकल्पनेला आकार देत अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे ‘अल्ट्रा झकासची दुर्गा’ हा खास संग्रह. या विशेष निवडीतून नऊ वेगवेगळ्या मराठी चित्रपटांद्वारे नऊ ‘अद्वितीय स्त्री’ पात्रं पडद्यावर जागृत होत आहेत.

या सर्व चित्रपटांमध्ये स्त्रियांची संघर्षमय, भावनिक आणि प्रेरणादायी वाटचाल दिसते. कुणी आत्मशोधाच्या प्रवासाला निघते, कुणी समाजातील अन्यायाला आव्हान देते, कुणी नात्यांतील गुंतागुंत आणि जबाबदाऱ्यांशी झुंजते, तर कुणी प्रेम, संवेदनशीलता आणि त्यागाचं सामर्थ्य दाखवते. या कथा स्त्रीशक्तीची विविध रूपं उलगडत, प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडतात.

१. काळूबाई पावली नवसला -अलका कुबल
श्यामराव आणि राधिकाला कामिनी मुलगी होते. एका वादातून राधिकेचा मृत्यू होतो. कामिनीला काकू छळते, पण आई काळूबाई नेहमीच तिच्या सोबत असतात. वर्षांनंतर कामिनी मोठी झाल्यावरही आई काळूबाई तिचं रक्षण करतात.

२. पैंजण – वर्षा उसगावकर
स्टार कलाकार पिलाजीराव बेपत्ता होतो. इन्स्पेक्टर अजय देशमुख चौकशी करतात आणि तमाशा पथकाच्या गुपितांतून गूढ रहस्य उलगडू लागतं.

३. हंपी – सोनाली कुलकर्णी
ईशा स्वतःला शोधायला हंपीला जाते. तिथे तिला कबीर भेटतो जो तिला छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवतो. त्यांच्या मैत्रीतून जीवनात नवा रंग भरतो.

४. सावर रे – मुक्ता बर्वे
मुक्ता एका अपघातात अपंग होते. तिची बहीण इंदू स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून बहिणीची सेवा करते आणि अपघात करणाऱ्या ड्रायव्हरला शोधण्याच्या निर्धाराने पुढे जाते.

५. RESPECT – प्राजक्ता माळी
सात महिलांच्या वेगवेगळ्या कथा, ज्या एकमेकांना कधी भेटल्या नाहीत, पण त्यांचा संघर्ष त्यांना एकमेकांशी जोडतो.

६. फटाकडी – सुषमा शिरोमणी
वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी फटकडी खुनीच्या मुलाला सत्य दाखवण्याचा प्रयत्न करते. या प्रवासात तिला बावल्या नावाच्या पोलिसाची साथ मिळते.

सुनीता आहुजा यांचा भावनिक खुलासा: “१५ वर्षांपासून आम्ही वेगळे राहत आहोत, पण अजूनही गोविंदावर प्रेम आहे”

७. संहिता – देविका दफ्तरदार
एका निर्मात्याची पत्नी तिच्या आजारी पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माहितीपट निर्मात्याला कामावर घेते. त्यातून राजघराण्याची कथा – राजा, राणी आणि दरबारी गायक यांच्यातील प्रेम-कर्तव्य-विश्वासघाताची कहाणी उलगडते.

८. गौरीच्या लग्नाला यायचं हं – स्मिता तांबे
गौरीच्या काळ्या रंगामुळे तिला नवरा मिळत नाही आणि ती नैराश्यात जाते. पण एक शाळामास्तर तिचा आत्मविश्वास वाढवतो. मैत्री हळूहळू प्रेमात बदलते आणि गौरी अखेर लग्नाच्या मंडपात पोहोचते.

९. लोकशाही – तेजश्री प्रधान
एका मुलीला वडिलांचा राजकीय वारसा मिळतो. पण त्या वारशामागचं सत्य उलगडताना तिला कटकारस्थानं, कौटुंबिक संघर्ष आणि न्यायासाठीची लढाई यांचा सामना करावा लागतो.

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

या नऊ चित्रपटांतून नवरात्रीचे नऊ रंग आणि स्त्रीत्वाच्या नऊ शक्तिरूपांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. अल्ट्रा झकास ओटीटीचा हा उपक्रम स्त्रीशक्तीचा सन्मान करताना प्रेक्षकांना नव्या प्रेरणाही देतो. ‘अल्ट्रा झकासची दुर्गा’ हा संग्रह फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो स्त्रीशक्तीचा गौरव करणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा आहे. नवरात्रीच्या निमित्ताने इंस्टाग्राम वर “नवरात्री ९ दिवस – ९ रंग” ही विशेष मोहीमही राबवली जात आहे. या मोहिमेतून दररोज त्या दिवसाचा रंग, त्याचा अर्थ आणि संबंधित देवीचं प्रतीकात्मक दर्शन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचा हा उपक्रम स्त्रीत्वाच्या विविध छटा साजऱ्या करताना नवरात्रीच्या उत्सवाला एक नवा सांस्कृतिक आयाम प्रदान करतो.

Web Title: Nine days nine stories a collection of navratri special films on ultra jakaas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • marathi movie
  • Marathi News
  • Navratri 2025

संबंधित बातम्या

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
1

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प
2

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी
3

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई
4

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.