
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राजकारणी राघव चढ्ढा (Raghav Chaddha) यांची जोडी सध्या इंडस्ट्रीत चर्चेत आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल बरेच दिवस मौन बाळगले होते. मे मध्ये दोघांनी दिल्लीत साक्षगंध उरकलं.या सोहळ्यात बॉलिवूडपासून राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता. परिणीती आणि राघवच्या साक्षगंधानंतर आता लोक त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता परिणीती आणि राघवच्या लग्नाची तारीखही (Parineeti Chopra and politician Raghav Chaddha wedding date) ठरल्याची बातमी समोर येत आहे.
[read_also content=”महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालकांवर शारिरीक अत्याचाराचा गुन्हा दाखल, मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप! https://www.navarashtra.com/india/case-of-physical-abuse-has-been-filed-against-the-deputy-director-in-the-women-and-child-development-department-nrps-447092.html”]
परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या तारखेबाबत बातम्या येत आहेत. हे लव्ह बर्ड्स या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही यावर्षी 25 सप्टेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र, अद्याप लग्नाच्या तारखेबाबत दोन्ही बाजूंकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या लग्नाशी संबंधित सर्व विधी लग्नाच्या एक आठवडा आधी सुरू होतील. सोबतच त्यांचे लग्नही मोठ्या थाटामाटात होणार आहे. दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांव्यतिरिक्त, बॉलिवूड इंडस्ट्रीपासून ते राजकीय जगतातील लोक लग्नाला उपस्थित राहू शकतात.
दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा राजस्थानमध्ये लग्न करू शकतात, अशा बातम्याही येत आहेत. या दोघांनी काही काळापूर्वी उदयपूर येथील पर्यटन विभागाच्या उपसंचालकांची भेट घेऊन चांगल्या ठिकाणांची आणि हॉटेलची माहिती घेतली होती. तेव्हापासून परिणीतीही तिची बहीण प्रियांका चोप्राप्रमाणेच शाही पद्धतीने लग्न करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नाही तर राजस्थानमध्ये लग्न झाल्यानंतर त्यांचे रिसेप्शन गुडगावमध्ये होणार आहे.
राघव-परिणितीने मे महिन्यात नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. कार्यक्रमाची सुरुवातपारंपारिक प्रार्थना ‘अरदास’ने झाली. भजन गाऊन ते दोघंही गुरुद्वाराच्या दिशेने निघालो. सायंकाळी 5 वाजता शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबच्या काही भागाचे शुकुमणी साहिब यांनी पठण केले. यानंतर प्रार्थना सुरू झाली. राघव-परिणितीचा हा खास दिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.