(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ घेऊन येत आहे अनेक खास सरप्राइज, भावनांनी बहरलेला नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांचे खास परफॉर्मन्सेस! यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘प्रेम, स्नेह, त्याग आणि करुणा’ या भावना साजऱ्या करणाऱ्या विविध थीम्सवर आधारीत एकाहून एक भन्नाट परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत. रसिकांसाठी ही एक अविस्मरणीय कलाकृती ठरणार आहे. तारिणी- केदारची जोडी दमदार अॅक्शन फँटसी नृत्यातून पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे पारू- आदित्य चा प्रेमाची जाणीव करून देणारा भावनिक नृत्याविष्कार दिसेल. ‘कमळी’ मध्ये गुरू-शिष्य नात्याचा गौरव करणारा धमाकेदार ऍक्ट पाहायला मिळेल, ज्यात ऋषी आणि कमळी यांची जुगलबंदी प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या अॅक्टमध्ये सावली चा रोमँटिक ऍक्ट पाहायला मिळणार आहे. ‘वीण दोघातली ही तुटेना’ समर- स्वानंदी च्या धमाकेदार ऍक्ट पाहायला मिळेल.
“6 महिन्यात मला कळलं मी लग्न करुन चूक केली”; अभिनेत्री मयुरीचा वाघ घटस्फोटावर स्पष्टच बोलली
भावना आणि सिद्धू हे जोडपं नव्याने एकमेकांना ओळखत, सहलीचा आनंद लुटताना दिसतील. या अॅक्टमध्ये प्रेम, मैत्री, नवखेपणा आणि मिश्कील क्षणांचा अनुभव मिळणार आहे. त्यांचा सहजसुंदर संवाद आणि बाळबोध खोड्या प्रेक्षकांना खळखळून हसवतील. तसेच, मीरा, अंबिका आणि अथर्व अॅक्ट मृत्यूपलीकडचं प्रेम दर्शवेल.
अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!
ऋषी म्हणजेच निखिल दामले ने आपल्या कपल अॅक्टबद्दल बोलताना सांगितले “मी आणि विजयानी ‘नटरंग उभा…’ या गाण्यावर एकत्र परफॉर्म केल. माझ्यासाठी ही एक खास संधी होती कारण पहिल्यांदाच मी अर्धशास्त्रीय नृत्य प्रकार स्टेजवर सादर केला. “झी मराठी अवॉर्ड” सारख्या प्रतिष्ठित मंचावर हे नृत्य सादर करणं खूपच जबाबदारीचं काम होतं. मनात थोडं दडपण होतं, कारण हे काहीतरी वेगळं आणि आव्हानात्मक होतं. सरावासाठी वेळ फार कमी मिळाला, पण आम्ही दोघांनीही त्या वेळेचा योग्य उपयोग करून मेहनत घेतली. आमचं सादरीकरण यशस्वी झालं आणि उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. टाळ्यांचा आवाज ऐकून खरंच खूप आनंद वाटला. आमचे कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी आमचं कौतुक केलं आणि या नृत्याला त्यांचं आवडतं परफॉर्मन्स म्हटलं. हे ऐकून आम्हाला खूप समाधान मिळालं. या परफॉर्मन्समुळे मला एक नवीन नृत्यशैली शिकायला मिळाली आणि स्टेजवर नृत्य सादर करण्याचा आत्मविश्वासही वाढला. मला उत्सुकता लागून राहिली आहे हा परफॉर्मेंस टीव्हीवर पाहण्यासाठी.”