Mayuri Wagh and Piyush Ranade Divorce : झी मराठीवरील ‘अस्मिता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी वाघ तिच्या घटस्फोटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्याच वर्षी मयुरीचा पुर्वाश्रमीतचा पती अभिनेता पियूष रानडे याने अभिनेत्री सुरुची अडारकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. पियूष रानडेचं हे तिसरं लग्न.
मात्र त्याची दुसरी पत्नी मयुरी वाघ आणि पियूष यांनी भेट झाली ती अस्मिता मालिकेच्या सेटवर. आधी मैत्री आणि मग प्रेम झालं. त्यानंतर .या दोघांची एकमेकांशी लग्नगाठ बांधली मात्र लग्नाच्या सहा महिन्यातच मयुरी आणि पियूष विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाची चर्चा मनोरंजन विश्वात होत होती. मात्र पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय सुरु झाला आहे. मयुरीने पियूषशी लग्न करुन किती मोठी चूक केली याचा धक्कादायक खुलासा केला आहे. मित्र म्हणे या पॉडकास्टवर तिने लग्नानंतर झालेल्या फसवणूक आणि अत्याच्यारांचा गंभीर खुलासा केला आहे.
मित्र म्हणे या पॉडकास्टवर मयुरी वाघ हिने देखील हजेरी लावली. मयुरीला तिच्या लग्नासंबंधी प्रश्न विचारले गेले त्यावेळी मयुरी म्हणाली की, लग्नाच्या सहा महिन्यातच मला कळलं की आपण खूप मोठी चूक केली. मी लग्नाचा निर्णय खूप पटकन घेतला. घटस्फोट घेताना मला कोणत्याही प्रकारे पश्चाताप झालेला नाही. मयुरी पुढे असं देखील म्हणाली की, आताच्या जनरेशनचं सांगायचं झालं तर, मुलं असो किंवा मुली लग्नाबाबत त्यांचे विचार खूप स्पष्ट आहेत. आपल्या जोडीदाराकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे त्यांचं त्यांना माहित आहे. माझं मात्र तसं नव्हतं, मी प्रेमात पडले आणि लगेच लग्न केलं. बरं या सगळ्यात माझ्या पालकांना मला खूप पाठींबा मिळाला अगदी घटस्फोट घेताना सुद्धा माझे आई वडील माझ्या पाठीशी होते.
लग्नानंतर अशा अनेक घटना घडल्या जिथे मी खचले. मला डिप्रेशन आलं होतं. माझ्या स्वाभिमाना ठेच लागूनही अनेक गोष्टी मी सहन केल्या. पियूषने अनेकदा मला मारहाण केली ती देखील मी मुकाट्याने सहन केली. त्याला कधी विचारलं कुठेस काय करतोय तो कधीच नीट उत्तरं देत नव्हता. माझं मानसिक स्वास्थ लग्नानंतर खूप खराब झालं होतं. लग्नाच्या चार महिन्यातच माझ्या बाबांना जाणवलं की, हे लग्न करुन खूप मोठी चूक झाली. मात्र एवढं सगळं होऊनही माझे वडील खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते.
मला लग्नाच्या नंतर पियूषच्या काही गोष्टी कळल्या. घटस्फोच झाल्यानंतर मी स्वत:ला सावरत नवं आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करायला लागले. त्यानंर काही सहकलाकार आणि जवळच्या मित्रांकडून उशीरा कळलं की पियूष खरा कसा आहे. त्यानंतर मला मोठा धक्का बसला होता. मी कोविडमध्ये आईबाबांकडे राहायला गेले. जर मी त्यावेळी देखील पियूषबरोबरच असते तर कदातित आज मी या जगातच नसते. असं अभिनेत्री मयुरी वाघ हिने सांगितलं आहे.
पॉडकास्टंमध्ये तिला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं असता, मयुरी म्हणाली की, आता दुसऱ्या लग्नाची मला भिती वाटते. विश्वास ठेवताना मी घाबरते त्यामुळे सध्यातरी माझा दुसऱ्या लग्नाबाबत कोणताही विचार नाही, असं अभिनेत्री मयुरी वाघ हिने सांगितलं आहे.