Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार, गुन्हेगारांची बोलती बंद करणाऱ्या Posco 307 चा ट्रेलर रिलीज

२०१२ साली आलेल्या पॉस्को ३०७ या माहीत नसलेल्या कायद्याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू असलेली पाहायला मिळतेय. हो, कारण काही दिवसांपासून पॉस्को ३०७ या कायद्यावर आधारित नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 07, 2025 | 08:25 PM
गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार, गुन्हेगारांची बोलती बंद करणाऱ्या Posco 307 चा ट्रेलर रिलीज

गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार, गुन्हेगारांची बोलती बंद करणाऱ्या Posco 307 चा ट्रेलर रिलीज

Follow Us
Follow Us:

२०१२ साली आलेल्या पॉस्को ३०७ या माहीत नसलेल्या कायद्याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू असलेली पाहायला मिळतेय. हो, कारण काही दिवसांपासून पॉस्को ३०७ या कायद्यावर आधारित नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं आणि तेव्हापासून हा कायदा नेमका काय आहे हे जाणून घेण्याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळाली.

“मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…”, प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा

चित्रपटाच्या टिझरने तर ही उत्सुकता वाढवली मात्र आता या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच ताणताना दिसतोय. लैंगिक अत्याचार, बलात्कार या सगळ्याला आळा घालायला हा नवा कोरा चित्रपट येत्या १६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘पोस्को ३०७’ हा कायदा साऱ्यांपासून वंचित राहिला आहे. हा कायदा गुन्हेगाराला नक्की कोणती शिक्षा मिळवून देणार त्यांनी केलेला लैंगिक अत्याचार, बलात्कार याला योग्य ती शिक्षा मिळवून देणार का?, हे विषय चित्रपटाच्या ट्रेलर मधून स्पष्ट दिसत आहेत.

उत्तम संवाद, जबरदस्त डायलॉग आणि ॲक्शनचा भरणा असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने साऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये पाहता कलाकारांचा अभिनय हा मोठा पडद्यावर पाहणं फारच रंजक ठरणार आहे. ट्रेलरवरून असे समजते की एका नाजूक अशा विषयाला उत्तमरीत्या सांभाळत या चित्रपटाने ‘पॉस्को ३०७’ या कायद्याची जाणीव साऱ्यांना करून दिली आहे. महाभारतातील अनेक घटनांचा आधार घेत या चित्रपटाची बांधणी केली असल्याचंही ट्रेलरच्या संवादावरून स्पष्ट होत आहे. ‘सिया एंटरटेनमेंट’ आणि कौशिक मेहता प्रस्तुत आणि वैशाली बाळासाहेब सावंत व प्रेमलताचंपक संघवी निर्मित ‘पॉस्को ३०७’ चित्रपट आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर किरण मानेची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल, पोस्ट शेअर करत भारतीय लष्कराचे केले अभिनंदन

स्वरूप सावंत दिग्दर्शित हा चित्रपट असून त्यानं या चित्रपटाच्या कथेची आणि पटकथेची जबाबदारी ही उत्तमरीत्या पेलवली आहे. विशाल सुदाम जाधव, केशव कल्याणकर यांनी चित्रपटाच्या पटकथा आणि संवादाची धुरा सांभाळली आहे. तर सोपान पुरंदरे यांनी हा चित्रपट त्यांच्या कॅमेरात कैद केलाय. या चित्रपटाला प्रथमेश कानडे याने संगीत दिलं असून संकलक म्हणूनही स्वरूप सावंत याने बाजू सांभाळली आहे. जबरदस्त डायलॉग आणि एक्शन सीनचा भरणा असलेला हा पॉस्को ३०७ हा चित्रपट १६ मेपासून चित्रपटगृहात पाहायला विसरू नका.

Web Title: Posco marathi movie trailer out on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 08:25 PM

Topics:  

  • marathi movie
  • POSCO Act

संबंधित बातम्या

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा
1

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
4

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.