"मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…", प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता प्रतीक पाटील कायमच चर्चेतलं नाव… नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला हा बॉलिवूड अभिनेता सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांचा प्रतीक हा मुलगा आहे. प्रतीकच्या जन्मावेळी स्मिता पाटील यांना ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील अवयवांनी काम करणं बंद केले होतं. स्मिता पाटील यांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी जगाचा निरोप घेतला.
२००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘जाने तू… या जाने ना’ चित्रपटातून प्रतीकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा तो २२ वर्षांचा होता. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, तो मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये शिकायला गेला. पण चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या या अभिनय इन्स्टिट्युटमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. कारण होतं, ड्रग्जचं व्यसन… नुकतंच प्रतीकने बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रतीकने ड्रग्जच्या व्यसनामुळे त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला.
आयुष्यातल्या गोष्टींचा पश्चात्ताप झाल्याचा खुलासा करताना प्रतीक पाटीलने सांगितलं की, “मी माझ्या लहानपणापासूनच खूप चुकीचे निर्णय घेतलेय. मी बालपणापासूनच दारु आणि अंमली पदार्थाच्या आहारी गेलो होतो. मी माझ्या काही विक गोष्टींमुळे (कमकुवतपणा) व्यसनाच्या आहारी गेलो होतो. माझ्याकडे व्यसन करण्यासाठी खूप कारणं होते. जेव्हा कोणासोबतही त्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा मला त्या गोष्टी फार गुंतागुतीची वाटते, त्यापेक्षा क्लिष्ट गोष्टी त्यावेळी होत्या. पण त्या निर्णयांमुळे माझ्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात मोठं नुकसान झालं.”
प्रतीकच्या जन्मावेळी स्मिता पाटील यांना ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील अवयवांनी काम करणं बंद केले होतं. स्मिता पाटील यांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी जगाचा निरोप घेतला. आई गेल्यानंतर प्रतीकला त्याच्या आजी-आजोबांनी (स्मिताचे आई-वडील) त्याचं संगोपन केलं. पण त्यांना खूप त्रास दिल्याचा आता प्रतीकला पश्चात्ताप आहे. ” आजी- आजोबांच्या जाण्याआधीच्या शेवटच्या काही वर्षांत मी त्यांना फार वाईट अवस्थेत पाहिलं. मी व्यसनी होतो. मला व्यसनाधीन पाहूनच माझी आजी वारली, याचा मला पश्चात्ताप आहे. आज मी जसा आहे तसं मला तिने पाहिलं असतं तर बरं झालं असतं,” असं म्हणत अभिनेत्याने आपलं पश्चातापाचं कारण सांगितलं.
ड्रग्जच्या अधिन गेल्यामुळे प्रतीकला शाळा, महाविद्यालयांमधून आणि ड्रामा स्कुलमधूनही काढून टाकण्यात आलं होतं, असा खुलासा प्रतीकने मुलाखतीदरम्यान केला होता. ” मी ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटाचं शूटिंग केलं आणि मग व्हिसलिंग वुड्समध्ये गेलो. त्यावेळी मी अभ्यास करत होतो. पण मला अभ्यासात उत्साहाच नव्हता. कारण मी काय करतोय आणि काय नाही हेच मला माहिती नव्हतं. मी तिथे २ वर्षे होतो. मी ड्रग्ज घेतल्याने मला व्हिसलिंग वुड्समधून बाहेर काढण्यात आलं. आता जेव्हा मी त्याबद्दल विचार करतो तेव्हा मला हसायला येतं. मी ज्या ज्या शाळेत आणि कॉलेजमध्ये गेलो तिथून मला हाकलून लावण्यात आलं. कारण मी उपद्रवी होतो.”