Kiran Mane Shared Post On Operation Sindoor
जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यामध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ने घेतली होती. या २६ जणांमध्ये, दोन विदेशी, दोन स्थानिक आणि २२ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे. हे सडेतोड उत्तर दिल्याच्या नंतर कोट्यवधी भारतीयांच्या मनात आणि प्राण गमावलेल्या २६ निरपराध पर्यटकांच्या नातेवाईकांचा आज उर भरून आला आहे. त्या निरपराध पर्यटकांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना संपूर्ण भारतीयांची आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’वर मराठी सेलिब्रिटींच्या पोस्ट; सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आनंद…
दरम्यान, या हल्ल्यावर आता भारतीय सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक मराठी सेलिब्रिटी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. ६ आणि ७ एप्रिलच्या मध्यरात्री उशिरा भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केले आहे. या एअर स्ट्राईकमध्ये, भारतीय लष्कराने पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मिरातील असलेले दहशतवाद्यांचे तळं उद्ध्वस्त केलेली आहेत. यामध्ये एकूण ९ दहशतवादी तळ नष्ट केली आहेत. भारतीय लष्कराने हा एअर स्ट्राईक मध्यरात्री १: ३०च्या सुमारास केला. आता या हल्ल्यावर मराठी टेलिव्हिजन अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, ” भारतीय हवाई दलाचं अभिनंदन! एकाही निरपराध्याला लक्ष्य न करता फक्त संशयित अतिरेकी तळांवर हल्ले करणं ही आपली संस्कृती जपली तुम्ही. किती गेले ? किती उरले ? हे यथावकाश कळेलच पण तुम्ही सणसणीत प्रत्युत्तर दिलंत. अभिमान आहे. जयहिंद… हा हल्ला लष्करानं ‘स्वबळावर’ केला. कुणा नेत्याच्या परवानगीचं बंधन नव्हतं. तुम्हाला पुर्णपणे मुभा असूनही तुम्ही अंधाधुंदपणा केला नाही. पुलवामाच्या वेळीही आपण कुणालाही मारले नव्हते, फक्त बॉम्बफेक करून जरब बसवली होती.”
‘मी लपून-लपून थकलो…’ ओझेम्पिक औषध घेतल्याच्या अफवेवर करण जोहरने सोडले मौन!
“इथल्या सर्वसामान्य कष्टकरी बहुजनांनी आपली लेकरं ज्या सेनेत भरती केली आहेत. त्या भारतीय लष्करावर आम्हाला कायम गर्व असेल! आपल्याकडं एक ‘वरणभात खाऊन पादणारी’ तीन टक्के पिलावळ आहे. ती भारतीय आर्मीच्या अतुलनीय पराक्रमाचं श्रेय छितपुट राजकारण्याला देऊन आमच्या कुटुंबाविषयी अर्वाच्य, अश्लील कमेंट करायला लागलीय. ते ही प्रोफाईल लॉक ठेऊन. भेकड पाकिस्तान्यांचीच अनौरस औलाद आहे ती. तिला कसं ठेचायचं ती आम्ही बघतो. भारतमाता की जय…”