Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नम्रपणे पण स्पष्टपणे आणि थेट… डॉक्टर”, निलेश साबळेच्या पोस्टवर प्रवीण तरडेंसह ‘या’ मराठी कलाकारांची प्रतिक्रिया

निलेश साबळेने या वादावर स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडिओवर इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अनेक सेलिब्रिटी कमेंट करत निलेश साबळेच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया देत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 04, 2025 | 06:01 PM
"नम्रपणे पण स्पष्टपणे आणि थेट... डॉक्टर", निलेश साबळेच्या पोस्टवर प्रवीण तरडेंसह 'या' मराठी कलाकारांची प्रतिक्रिया

"नम्रपणे पण स्पष्टपणे आणि थेट... डॉक्टर", निलेश साबळेच्या पोस्टवर प्रवीण तरडेंसह 'या' मराठी कलाकारांची प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियावर अभिनेता निलेश साबळे आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरु आहे. ‘चला हवा येऊ द्या २’ या कार्यक्रमामध्ये डॉ. निलेश साबळे ऐवजी लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अभिजित खांडकेकर सुत्रसंचालन करणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये राशीचक्रकार शरद उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी निलेश साबळेने शरद उपाध्ये यांना शोच्या सेटवर व्यवस्थित वागणूक दिली नव्हती. त्यासंबंधित शरद उपाध्ये यांनी पोस्ट शेअर केली होती.

लव्ह आणि रिलेशनशिपबद्दल उघडपणे मांडले नीना गुप्ता यांनी स्वतःचे मत, म्हणाल्या- ‘मला दिखावा आवडतो…’

त्या पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून, निलेश साबळेने व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केली. व्हिडिओमध्ये अभिनेत्याने स्पष्टीकरण देताना म्हटले की, “तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात, तुमचा मी मोठा फॅन आहे. कृपया, यापुढे कोणत्याही गोष्टीची माहिती न घेता पोस्ट शेअर करु नका. तुम्ही पोस्टमध्ये सुरुवातीला लिहिलंय की, “निलेश साबळेला ‘झी मराठी’ने डच्चू दिला…” हे अशाप्रकारे कोणत्याही माहिती नसलेल्या गोष्टीवर व्यक्त होताना जबाबदारीने बोलणं महत्त्वाचं आहे. झी मराठीमध्ये तुमचीही ओळख आहे तुम्ही एकदा फोन करून खरी माहिती घ्यायला हवी होती. मला ‘झी मराठी’ने बाहेर काढलेलं नाही. सध्या मी एका चित्रपटाच्या शूटमध्ये व्यग्र असल्याने या प्रोजेक्टमधून मी स्वतःहून माघार घेतली आहे.”

२ वर्षांनी अक्षया नाईकचं जबरदस्त कमबॅक! ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत साकारणार अनोखी भूमिका

निलेश साबळेने या वादावर स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडिओवर इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अनेक सेलिब्रिटी कमेंट करत निलेश साबळेच्या समर्थनार्थ आपली प्रतिक्रिया देत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिली की, “किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर… समोरच्या व्यक्तीला न दुखवता मुद्दा कसा मांडावा हे तू दाखवून दिलयस… तु एक नम्र कलाकार आहेस आणि कायम तसाच राहा…” तर ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडने लिहिलंय की, “तुझ्या प्रती कायम आदर आहे, डॉक्टर…” आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

शरद उपाध्ये- निलेश साबळे वादावर किरण मानेंची पोस्ट; म्हणाला, “टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण…”

तर ‘पारू’ फेम अभिनेता प्रसाद जावादेनेही डॉक्टर म्हणत निलेशवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. निलेश राऊतने लिहिलंय की, “तू व्यक्त होणं फार गरजेचं होतं निलेश”, अभिजित केळकर म्हणतो की, “किती नम्रपणे पण स्पष्टपणे आणि थेट… डॉक्टर”, सोशल मीडिया एन्फ्लूएंसर अथर्व सुदामे म्हणतो, “ग्रेट आहेत सर तुम्ही…”, तर, लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी यांनी लिहिलंय की, “शांतपणे… प्रगल्भपणे बोललास… तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे… गडहिंग्लजला तू कॉलेजमध्ये असताना माझ्या मैफिलीला येऊन भेटला होतास… तेव्हापासून जवळून पाहिलं आहे तुला… तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे… छान होऊ दे तुझा चित्रपट .. लवकर भेटू”

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संत तुकाराम’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, पुण्यातून दणक्यात प्रमोशनला सुरुवात

तर, शिल्पा नवलकर यांनी ‘उत्तम उत्तर दिलंय’ अशी कमेंट निलेश साबळेच्या पोस्टवर केली आहे. सुकन्या मोने, शर्मिला शिंदे, अद्वैत दादरकर, कविता मेढेकर, प्रियांका केतकर, संकेत पाठक, निखिल राऊत, रोहित परशुराम अशा अनेक मराठमोळ्या कलाकारांनी निलेशच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

Web Title: Pravin tarde and many more marathi celebritys support dr nilesh sable over sharad upadhye controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • marathi actor
  • nilesh sable
  • Television Shows

संबंधित बातम्या

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
1

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र
2

टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार; ‘लग्नाचा शॉट’मधून अभिजीत-प्रियदर्शिनी एकत्र

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक
3

‘मी आणि माझी मुलगी घरात अडकलोय.. मदत करा..’, Pushkar Jog च्या फ्लॅटला भीषण आग; घर जळून खाक

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर
4

Jay Dudhane Marriage : शुभमंगल सावधान! बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.