फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या नव्या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. लिव्ह इन रिलेशनशिपवर बेस्ड असणारा चित्रपट ‘बिना लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात तिच्यासह अभिनेता उमेश कामतही झळकणार आहे. दरम्यान, प्रियाच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या फार चर्चेत येत आहे. या मध्ये तिने तिच्यासोबत घडलेला एक लाजिरवाणा प्रकार शेअर केला आहे.
२०१० मध्ये शूटिंगहून घरी परतत असताना तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार घडला होता असे तिचे म्हणणे होते. रात्रीची वेळ होती. प्रिया रस्त्यावरून चालत होती. कानावर कॉल होता आणि त्यावर ती तिच्या मैत्रिणीशी संवाद साधत होती. इतक्यात अचानक एका विकृत माणसाने येऊन तिच्या स्तनांना स्पर्श केला. प्रियाच्या हातात सामान होतं. त्यामुळे ती लगेच ऍक्शन घेऊ शकली नाही. परंतु तिने मागे वळून पाहिले, तोपर्यंत तो व्यक्ती तिथून निसटला होता. घडलेला हा लाजिरवाणा प्रसंग घरी पोहचताच तिने तिच्या पालकांना सांगितला. तिच्या पालकांनाही फार वाईट वाटले आणि राग आला.
हा प्रसंग शेअर करताना प्रियाने पुढे सांगितले की “मी त्या दिवशीपासून मनात ठरवूनच टाकले की कुणीही माझ्याशी चुकीचं वागलं किंवा माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलेही तेव्हा त्याच क्षणी ऍक्शन घ्यायची. त्या व्यक्तीला असंच गप्प सोडायचं नाही.” तिच्या बोलण्यात फार राग दिसत होता, जो असलाच पाहिजे.
१२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार ‘बिन लग्नाची गोष्ट’
‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटात लोकप्रिय जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. टिझरमध्ये त्यांच्या नात्यातील गोडवा, सहजता आणि आपुलकी प्रेक्षकांचे मन वेधून घेतात. लग्न न करता एकत्र राहणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यात गरोदरपण येतं आणि त्यामुळे त्यांच्या नात्याला एक नवं वळण मिळतं. कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट असून, त्यामुळे गोष्ट अधिक रंगतदार होते. या चित्रपटात गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यांच्या नात्यातील रसायनशास्त्र पारंपरिक चौकटीबाहेरचे असून, दोन पिढ्यांतील नातेसंबंधांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवले आहे.