फोटो सौजन्य - X (JioHotstar Reality)
सलमान खानचा टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त लोकप्रिय शो बिग बॉस 19 सुरू व्हायला फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. बिग बॉस 19 च्या या नव्या सीजनमध्ये कोणते स्पर्धक जाणार यासंदर्भात मागील अनेक महिन्यापासून चर्चा सुरू आहे. अनेक अभिनेते अभिनेत्रींची नावे समोर येत होती यावर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर या संदर्भात स्पष्ट केले होते. आता कलर्स टीव्हीने तीन प्रोमो सोशल मीडियावर त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर शेअर केले आहेत. 22 ऑगस्ट रोजी सलमान खानचे बिग बॉस सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
आता कलर्स टीव्हीने त्यांच्या सोशल मीडियावर पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर केला आहे. कलर्स टीव्हीने शेअर केलेला प्रोमोमध्ये एका निळ्या रंगांमध्ये सूट घालून अभिनेता नाचताना दिसत आहे. यामध्ये तो म्हणाला आहे की टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध मुलगा म्हणून त्याला प्रेक्षकांनी प्रेम दिले आहे. सोशल मीडियावर कमेंट बॉक्समध्ये बिग बॉसच्या प्रेक्षकांनी गौरव खन्ना म्हणून त्याला ओळखले आहे. अनुपमा सिरीयलमधील महत्त्वाच्या कॅरेक्टरमध्ये असलेला गौरव खन्ना आता बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणा-यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.
Audience ka favorite beta is here to rule!
Jhalak mein jab itna mazza, puri picture mein toh lagega tadka 🔥Dekhiye #BiggBoss19, 24th August se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @colorstv par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/lhviURFJHE
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025
बिग बॉसने दुसरा प्रमो हा अवेज दरबार आणि नगमा मिराजकर या दोघांचा शेअर केला आहे हे दोघेही नाचताना दिसत आहेत. अजूनपर्यंत या दोघांचा प्रोमोमध्ये चेहरा रिव्हिल केलेला नाही पण चाहत्यांनी कमेंट्समध्ये त्यांना ओळखले आहे. मागील अनेक वर्षांपासून हे दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओजमुळे आणि डान्समुळे प्रसिद्धी मिळवली आहे. आता ते बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहेत. बिग बॉस सातची विजेती गोहर खान तिचा अवेज दरबार हा दीर आहे.
Pyaar dosti hai, aur aisi hi ek jodi aa rahi Bigg Boss ke ghar mein!
Kya banegi pyaar se sarkaar ya takraar?Dekhiye #BiggBoss19, 24th August se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @colorstv par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/ZpiBgcSVGu
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025
बॉलीवूड प्रसिद्ध गायक अमाल मलिक आणि अरमान मलिक यांची जोडी फारच प्रसिद्ध आहे. गायन क्षेत्रामधून अमान मलिक हा आता बिग बॉसच्या घरामध्ये त्याचे सूर गुणगुणताना दिसणार आहे. तू आती है सीने मे या गाण्यांमध्ये अमान मधी हा गाताना दिसत आहे आणि कलर्स टीव्ही ने हा प्रोमो शेअर केला आहे अजून पर्यंत त्याचा चेहरा पूर्णपणे दाखवण्यात आलेला नाही पण कमेंट सेक्शन मध्ये चाहत्यांनी त्याला ओळखले आहे.
Apne sur se dil jeetne wala aa raha hai ab apni sarkaar banane
Dekhiye #BiggBoss19, 24th August se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @colorstv par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/fqSo8mzmIz
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025