Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हास्यजत्रेची राणी झाली सुबोधची फुलराणी, अखेर समोर आला तिचा चेहरा, पाहा Video

सोशल मीडियावर मराठी सेलिब्रेंटीनी सुबोध भावेला (Subodh Bhave) टॅग करून ‘सुबोध ‘कोण आहे तुझी फुलराणी?’ (Phulrani Movie) हे विचारून फुलराणीच्या उत्सुकतेमध्ये भर पाडली. नेटकऱ्यांनी याला खूप छान प्रतिसाद देत ‘फुलराणी कोण’? याचे अंदाज बांधले. अखेर फुलराणीची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. (Phulrani Teaser)

  • By साधना
Updated On: Feb 13, 2023 | 04:45 PM
ti phulrani priyadarshini indulkar

ti phulrani priyadarshini indulkar

Follow Us
Close
Follow Us:

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिने तिच्या आगमनाची वर्दी दिली. तिची एक झलक पाहण्यासाठी सेलिब्रेंटीपासून ते प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येकजण आपल्यापरीने तर्कवितर्क लावत होते. एवढंच नाही तर, सोशल मीडियावरही मराठी सेलिब्रेंटीनी सुबोध भावेला (Subodh Bhave) टॅग करून ‘सुबोध ‘कोण आहे तुझी फुलराणी?’ (Phulrani Movie) हे विचारून या उत्सुकतेमध्ये आणखी भर पाडली. नेटकऱ्यांनी याला खूप छान प्रतिसाद देत ‘फुलराणी कोण’? याचे अंदाज बांधले. अखेर फुलराणीची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. (Phulrani Teaser)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून लोकप्रिय झालेली प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) ‘फुलराणी’च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. प्रियदर्शनीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील ‘बिवली अवली कोहली’ या पात्राला तर लोकांनी खूप डोक्यावर घेतलं आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २२ मार्चला ‘फुलराणी’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना प्रियदर्शनी सांगते,“ पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. ‘फुलराणी’तील त्या फुलवालीनं माझ्या अभिनय विश्वातल्या येण्याचं वर्तुळ पूर्ण केलं असल्याची भावना प्रियदर्शनीने व्यक्त केली. भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही ‘फुलराणी’ मी साकारली आहे. ‘प्रियदर्शिनी ते शेवंता’ बनण्याचा आपला प्रवास अत्यंत आश्चर्यकारक प्रवास अनपेक्षितपणे पूर्ण झाल्याचं सांगत ‘फुलराणी’ म्हणजेच प्रियदर्शनी म्हणाली की, खरं तर ‘फुलराणी’ सारखा इतका मोठा सिनेमा आणि त्यात टायटल रोल साकारण्याची संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. ‘फुलराणी’साठी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या गाजलेल्या एकपात्रीचं ऑडीशन द्यायला मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा माझं सिलेक्शन होईल असं वाटलंच नव्हतं. एक तर माझं पाठांतर नव्हतं आणि बऱ्याच अभिनेत्रींना हे तोंडपाठ आहे. त्यामुळे पाठ करून सादर करणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. आपण काही ‘फुलराणी’साठी सिलेक्ट होणार नसल्याचं मानून आपल्याला जसं वाटतंय तसं करूया असा विचार केला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी कॅाल आला आणि मला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं गेलं. तेव्हाही वाटलं की भेटून घेऊ, पण फिल्म मिळेल असं वाटलं नव्हतं. भेटल्यावर पहिल्याच मिटिंगनंतर विश्वास सरांनी मला लॅाक केलं होतं हे मला नंतर समजलं. त्यामुळे मीच ‘फुलराणी’ बनलेय हे मला स्वप्नवत असल्यासारखं वाटत होतं. खरंच आपली ‘फुलराणी’ म्हणून निवड झाली असून आपण सुबोध भावेसारख्या मोठ्या नटासोबत काम करणार आहोत यावर शूट सुरू होईपर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता. ‘फुलराणी’ बनणं माझ्यासाठी सुखकारक आणि अनपेक्षित होतं असंही प्रियदर्शनी म्हणाली.

‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे.
२२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.

या सोहळ्याला लेखक-दिग्दर्शक विश्वास जोशी, जाई जोशी, स्वानंद केळकर, अमृता राव, श्वेता बापट, लेखक आणि कवी गुरू ठाकूर, यांच्यासह चित्रपटाची पडद्यामागची टीम उपस्थित होती. संगीतकार नीलेश मोहरीर, वरुण लिखाते, पार्श्वसंगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि कवी मंदार चोळकर हे सुद्धा उपस्थित होते.

Web Title: Priyadarshini indalkar to play phulranis role with subodh bhave nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2023 | 04:11 PM

Topics:  

  • entertainment
  • subodh bhave

संबंधित बातम्या

कोण आहे Miss India International 2025? ताज जिंकल्यानंतर रुश सिंधूचे भारतात स्वागत, पाठिंब्याबद्दल मानले आभार
1

कोण आहे Miss India International 2025? ताज जिंकल्यानंतर रुश सिंधूचे भारतात स्वागत, पाठिंब्याबद्दल मानले आभार

अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला झालं तरी काय? हॉस्पिटलच्या बेडवर पोझ देताना दिसला, Video Viral
2

अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला झालं तरी काय? हॉस्पिटलच्या बेडवर पोझ देताना दिसला, Video Viral

जुनैद आणि साई पल्लवीच्या आगामी चित्रपटाचे नाव उघड, १७ वर्षांनंतर रंगणार आमिर – मन्सूरची जोडी
3

जुनैद आणि साई पल्लवीच्या आगामी चित्रपटाचे नाव उघड, १७ वर्षांनंतर रंगणार आमिर – मन्सूरची जोडी

‘कुली चित्रपटात काम करणे ही माझी मोठी चूक…’, असं का म्हणाला आमिर खान? काय आहे प्रकरण?
4

‘कुली चित्रपटात काम करणे ही माझी मोठी चूक…’, असं का म्हणाला आमिर खान? काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.