'देसी गर्ल'चा हळवा अंदाज, गरजूला केली मदत; प्रियंकावर होतोय कौतुकाचा वर्षाव
प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून कमालीची चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका भाऊ सिद्धार्थच्या लग्नानिमित्त ती भारतात आली होती, त्यानंतर ती चित्रपटाच्या कामानिमित्त हैद्राबादला गेली होती. चित्रपटाचं काम आटोपल्यानंतर आणि भावाचं लग्न झाल्यानंतर आता अभिनेत्री अमेरिकेत पुन्हा रवाना झाली आहे. तिच्यासोबत लेक मालतीही होती. मालतीसोबत लॉस एंजेलिसला जात असतानाच्या अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. व्हिडीओमधील तिच्या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. प्रियांकाने नेमकं काय केलं? जाणून घ्या…
मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका हैद्राबादला एसएस राजामौली दिग्दर्शित SSMB29 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फार मोठ्या ब्रेकनंतर प्रियांका भारतीय चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरंतर, प्रियांका चोप्रा दिग्दर्शक एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या SSMB29 या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला गेली होती. त्यानंतर प्रियांका मंगळवारी मुंबईत परतली. यावेळी आईच्या घरी जातानाच्या तिच्या एका कृतीची सध्या चर्चा होतं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सिग्नलला थांबलेल्या गाडीतून प्रियांका गरजूला मदत करताना पाहायला मिळत आहे.
पण अद्याप प्रियांकाने किंवा दिग्दर्शकांनी चित्रपटाबद्दल कुठलीही अपडेट चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही. एसएस राजामौली दिग्दर्शित SSMB29 चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रियांका चोप्रा आणि महेश बाबू आहेत, बाकीच्या स्टारकास्टबद्दल माहिती गुलदस्त्यात आहे. बुधवारी पहाटे, प्रियांका चोप्रा मुंबई विमानतळावरून अमेरिकेला जाताना दिसली. तिच्यासोबत मालतीही होती. मुंबई विमानतळावर पापाराझींच्या गऱ्हाळ्यात प्रियांकाने मालतीचे डोळे बंद करत तिला नेताना दिसली. त्याचदरम्यान तिथे असलेल्या काही चाहत्यांनी अभिनेत्रीकडे फोटो काढण्यासाठी विनंती केली. मात्र, प्रियांकाने चाहत्यांची माफी मागत माझ्यासोबत माझी छोटी मुलगी आहे, असं सांगून ती पुढे निघून गेली. अभिनेत्रीचा हा नम्रपणा पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.
सहसा, सेलिब्रिटींच्या मुलांना त्यांच्या नॅनी घेऊन जाताना दिसतात, परंतु इथे, प्रियांका स्वतः तिच्या मुलीची काळजी घेताना दिसत आहे. मालती झोपली असल्याने, प्रियांकाने कॅमेऱ्यांच्या फ्लॅशमुळे तिची झोप बिघडू नये याचीही काळजी घेतली.