पुण्यातील कल्याणनगरमध्ये शनिवारी झालेल्या अपघातामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. ती पोर्शे गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता. ही घटना पुण्यातील कल्याणीनगर येथे रविवारी (19 मे) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात आयटी इंजिनिअर असलेल्या तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला असता. या अपघाताने देशभरात खळबळ उडाली. या अपघाताबाबत अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने या घटनेबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या त्या व्हिडिओमुळे सोशल मिडीयावर प्रचंड चर्चा सुरु आहे.. केतकीने या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
केतकी चितळे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. आता केतकीने पुण्यातील पोर्श अपघातानंतर पोलीसांविरोधात ताशेरे उडवले आहेत. तिने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. मात्र या व्हिडीओनंतर केतकीवर अनेकांनी टीका केली आहे.
[read_also content=”पाकिस्तानातील उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला, कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट https://www.navarashtra.com/maharashtra/weather-forecasters-warn-pakistanis-to-stay-indoors-ahead-of-new-heatwave-and-weather-update-in-maharashtra-537083.html”]
काय आहे केतकीची पोस्ट?
केतकिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये केतकी असे म्हणताना दिसत की, “ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काहीच चूक नव्हती, असा पोलिसांनी प्लॅन करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांचा प्लॅन फसला. पोलीस महानालायक असतात हे आपल्याला माहिती आहे..तसेच जे लोक या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करायला गेले होते. त्यानांच पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं आहे. ही गोष्ट नवीन नाहीये. मला डायरेक्ट थ्रेट देण्यात आले, तेव्हा कळंबोली पोलीस ठाण्यात मी गेले होते, केतकी तूच कशी? असे प्रश्न मला पोलिसांनी विचारले होते. असा व्हिडीओ केतकीने लेट्स टॉक या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
काय आहे प्रकरण?
हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. कल्याणी नगरमध्ये हा अपघात घडला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने हा अपघात केला होता. महागड्या पोर्श कारने दुचाकीवरील दोघांना चिरडले होते. दोन्ही अभियंते होते. प्रकरणात अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी पिझ्झा आणि बर्गर आणून दिले होते. कोर्टाने काही अटी-शर्तीवर त्याची 15 तासांच्या आत जामिनावर सुटका केली होती.