
बॉडीबिल्डर अभिनेता वरिंदर सिंह घुमानचे निधन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मिस्टर इंडिया किताबाचे मानकरी
२००९ मध्ये वरिंदर घुम्मन यांनी मिस्टर इंडिया हा किताब जिंकला. त्यांना जगातील पहिले शुद्ध शाकाहारी बॉडीबिल्डर मानले जात असे. वरिंदर घुमान यांनी अनेक पदके जिंकली आहेत. त्यांनी मिस्टर आशिया स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. ते आयएफबीबी प्रो कार्ड मिळवणारे पहिले बॉडीबिल्डर आहेत. २०११ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया ग्रांप्रीमध्ये यश मिळवले. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि भारतीय संघाचे नेतृत्व केले.
गर्विष्ठ देहबोली आणि डोळ्यात अंगार! ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता मंबाजीच्या भूमिकेत
चित्रपटातही केले काम
बॉडीबिल्डिंग व्यतिरिक्त, वरिंदरने पंजाबी आणि हिंदी चित्रपट उद्योगातही स्वतःचे नाव कमावले आहे. त्याने २०१२ मध्ये कबड्डी वन्स अगेनमध्ये मुख्य भूमिका साकारली होती आणि रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स (२०१४) आणि मरजावां (२०१९) सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही तो दिसला आहे.
पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
ਪੰਜਾਬ ਦੇ ਮਸ਼ਹੂਰ ਬਾਡੀਬਿਲਡਰ ਤੇ ਅਦਾਕਾਰ ਵਰਿੰਦਰ ਸਿੰਘ ਘੁੰਮਣ ਜੀ ਦੇ ਅਚਾਨਕ ਦੇਹਾਂਤ ਦੀ ਖ਼ਬਰ ਸੁਣ ਕੇ ਦਿਲ ਬਹੁਤ ਦੁਖੀ ਹੈ। ਉਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੀ ਸਖ਼ਤ ਮਿਹਨਤ, ਅਨੁਸ਼ਾਸਨ ਤੇ ਕਾਬਲੀਅਤ ਨਾਲ ਪੰਜਾਬ ਦਾ ਨਾਮ ਦੁਨੀਆ ਭਰ ‘ਚ ਰੌਸ਼ਨ ਕੀਤਾ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਉਹਨਾਂ ਦੀ ਆਤਮਾ ਨੂੰ ਚਰਣਾਂ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਬਖ਼ਸ਼ਣ ਤੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਇਹ ਦੁਖਦਾਇਕ ਭਾਣਾ… pic.twitter.com/ZVQHUNWVf6 — Sukhjinder Singh Randhawa (@Sukhjinder_INC) October 9, 2025
पंजाबचे उपमुख्यमंत्री, काँग्रेस नेते आणि डेरा बाबा नानक येथील आमदार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी पंजाबी भाषेत लिहिले की, “पंजाबचे प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंग घुमान यांच्या अचानक निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कठोर परिश्रमाने, शिस्तबद्धतेने आणि प्रतिभेने त्यांनी जगभरात पंजाबचे नाव उंचावले. वाहेगुरु त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”
राजवीर जवंदाला वरिंदर वाहिली होती श्रद्धांजली
मरण्यापूर्वी एक दिवसाआधीच वरिंदरने प्रसिद्ध गायक राजवीर जावंदाला श्रद्धांजली वाहिली होती, त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, भावांनो, राजवीर जावंदा यांचे निधन पंजाब आणि पंजाबी संगीत उद्योगासाठी खूप मोठे नुकसान आहे. वाहे गुरु त्यांच्या कुटुंबाला हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. आम्ही प्रसिद्ध गायक राजवीर जावंदा यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
Rajvir Jawanda Death: पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन, ११ दिवस व्हेंटिलेटरवर; हरला मृत्यूची झुंज