Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनदोरा देवजी हे ओखा एक्स्प्रेसने गुजरात ते गोवा असे प्रवास करत होते. संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे ते रेल्वेतून पडले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2026 | 03:04 PM
Ratnagiri News: रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

संगमेश्वर रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मृत्यू
उपचारासाठी रूग्णालयात केले दाखल
उपचारादरम्यान प्रवाशाचा मृत्यू

रत्नागिरी: कोकण रेल्वेच्या ओखा एक्स्प्रेसने प्रवास करणारा गुजरात वैधील प्रवासी संगमेश्वर प्लॅटफार्मवर जवळ रेल्वेतून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान प्रवाशाचा मृत्यू झाला. मनदोरा रमेश देवजी (वय ४८. रा. जामनगर, गुजरात) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी पावणे नठाच्या सुमारास संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनदोरा देवजी हे ओखा एक्स्प्रेसने गुजरात ते गोवा असे प्रवास करत होते. संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे ते रेल्वेतून पडले. तात्काळ रेल्वे पोलिसांनी त्यांना रत्नागिरीत आणून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी (दि. २०) सकाळी पावणेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कशेडीमध्ये अडीच लाखांची दागिने चोरी

कशेडी येथील ओझरवाडी येथे भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बहिणीचे एकूण २.५८, ७३६ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्‌याने चोरून नेले. मंगळवार (दि. ०३) सकाळी १०:३० ते बुधवारी (दि. ०४) सकाळी १०:३० या दरम्यान ही घटना घडली. याबाब वैशाली विनायक सुर्वे (वय ५२, रा. म्हसळा जि. रायगड, सध्या कासार चाळ, मालपा डोंगरी, अंधेरी पूर्व मुंबई) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरट्याचा तपास सुरू आहे.

Crime News: घंटा चोरीप्रकरणी तिघांना कोठडी; तपासात झाला १६ चोऱ्यांचा उलगडा

घंटा चोरीप्रकरणी तिघांना कोठडी

रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मंदिरातून झालेल्या धातूच्या पितळी घंटा, समई व इतर ऐवज चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या राकेश तुळशीराम पडवकर (लोणावळा), जगलाल केवट (उत्तरप्रदेश), हिरालाल कुम्हार (पनवेल) यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत ५०० हुन अधिक किलो ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे, चोरीप्रकरणात आणखी काहींच्या सहभागाचा पोलिसांना संशय असून पथके त्यांच्या मागावर आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चिवेक अहिरे यांनी तालुक्यातील शिरगाव खुर्द-शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिरातील पितळी घंटा चोरीप्रकरणाचा छडा लावला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Kokan railway passenger injured after falling from train dies sangmeshwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Death
  • kokan railway
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन
1

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार
2

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण
3

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.